Ganesh Chaturthi 2023 : 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेशाची प्रतिष्ठापना झाली असून आता बाप्पा दहा दिवस विराजमान राहणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान घरात काही शुभ गोष्टी आणल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो. गणपतीला अनेक गोष्टी आवडतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात या वस्तूंची खरेदी नक्की करा. गणेशोत्सवादरम्यान या वस्तू घरी आणल्याने कधीही धनाची कमतरता भासत नाही आणि बाप्पाही प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात, असा समज आहे. या गोष्टींबद्दल जाणून घ्या.


 


विद्येची देवता, संकटांचं निवारण करणारी देवता
गणेश ही विद्येची देवता, संकटांचं निवारण करणारी देवता म्हणून प्रसिद्ध आहे. एखाद्या महत्कार्याच्या आरंभी ' श्री गणेशाय नम: ' म्हणून गणेशाची स्तुती व आराधना करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे अध्ययनाच्या आरंभीही गणेशाचा नामोच्चार करतात. हा देव सकळ विघ्नांचा हर्ता व मंगलमूर्ती असा मानला जात असल्यामुळे या देवाचे पूजन सर्वांच्या घरी होते.


 


एकमुखी नारळ
अशी धारणा आहे की, गणेशोत्सवादरम्यान घरात एकमुखी नारळ आणावा, ते खूप शुभ मानले जाते. पूजेमध्ये एकमुखी नारळ अर्पण करा आणि नंतर पूजास्थानी किंवा तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की, या नारळात धन आकर्षित करण्याची अद्भुत शक्ती आहे.


 



गणेशाची मूर्ती
गणेश चतुर्थीनिमित्त अनेकजण घरी मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. मात्र यानंतर विसर्जन केले जाते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या सणात एखादी नाचणारी गणेशाची मूर्ती किंवा चित्र आणून घराच्या मुख्य दरवाजावर किंवा उत्तर दिशेला लावावे. यामुळे घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश थांबेल.


 



शंख
हिंदू धर्मात शंखामध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. गणेशोत्सवाच्या विशेष प्रसंगी शंख घरी आणल्याने आर्थिक प्रगती होते आणि वास्तुदोषही दूर होतात. त्यामुळे या दिवसात शंख आणून गणपतीची पूजा आणि आरती झाल्यानंतर दररोज शंख वाजवावा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार वाढेल.


 



कुबेर देवता
भगवान कुबेर हे संपत्तीचे देवता मानले जातात. कुबेर देवाची मूर्ती घरात ठेवल्याने गणेश आणि देवी लक्ष्मी दोघेही प्रसन्न होतात आणि घरातील दारिद्र्यही दूर होते.


 



बासरी
घरात बासरी ठेवणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही चांदीची बासरी देखील ठेवू शकता. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या या शुभमुहूर्तावर बासरीची खरेदी नक्की करा.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Astrology : महिलांनी 'या' सवयींपासून दूर राहावे, अशा घरात देवी लक्ष्मी फार काळ टिकत नाही, जाणून घ्या