Chandra Grahan 2023 Live Updates : आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा! वेळ, सुतक काळ जाणून घ्या
Chandra Grahan 2023 : 28-29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. जाणून घ्या या संबंधित घडामोडी
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 28 Oct 2023 08:46 PM

पार्श्वभूमी
Chandra Grahan 2023 : ज्योतिष आणि धर्मात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. 2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 01:05 पासून सुरू होईल आणि 02:23 पर्यंत चालेल. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा...More
Chandra Grahan 2023 : ज्योतिष आणि धर्मात ग्रहणाचे विशेष महत्त्व आहे. 2023 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 01:05 पासून सुरू होईल आणि 02:23 पर्यंत चालेल. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे. हे खग्रास चंद्रग्रहण आहे, परंतु धार्मिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण शुभ मानले जात नाही. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतातही दिसणार आहे. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे.
Chandra Grahan 2023: काहीच तासात ग्रहण काळाला होणार सुरुवात, मंदिरांचे दरवाजे बंद
Chandra Grahan 2023: आता चंद्रग्रहण (चंद्रग्रहण 2023) साठी फक्त काही तास उरले आहेत, पंचांगानुसार, ते 28-29 ऑक्टोबरच्या रात्री 01:05 वाजता सुरू होईल. चंद्रग्रहण पहाटे 02:24 पर्यंत राहील. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी सुरू झाला असून, देशातील प्रसिद्ध मंदिरांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.