पुणे : संत तुकाराम महाराजांची पालखी (Tukaram Maharaj) आज सकाळी 7 वाजता पुण्याकडे मार्गस्थ होईल. पुण्यातील नाना पेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आळंदीतून सकाळी 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ होईल. पुण्यातील भवानी पेठमधील पालखी विठोबा मंदिरात दोन दिवस मुक्कामी असेल. दोन दिवस पालखी याच ठिकाणी मुक्काम करून नंतर शहराला निरोप देईल. त्यामुळे या पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्या रस्त्यांसाठी पर्यायी रस्ते सुचवण्यात आले आहेत. 


लाईव्ह लोकेशनमुळे नागरिकांना फायदा...


diversion.punepolice.gov.in या लाईव्ह लोकेशनमुळे रस्ते खूप वेळ बंद राहणार नाहीत. पालखी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताची


वाहतुकीस बंद असणारे रस्ते- कंसात पर्यायी मार्ग


गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता.


फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स.


शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता.


टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल.


लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता.


पालखी मार्गावर ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर.


पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रस्ते बंद


नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. या भागातील रस्ते सोमवारी (12 जून) दुपारी 12 नंतर वाहतुकीस बंद करण्यात येणार आहेत. पालखी सोहळा बुधवारी (14 जून) सकाळी शहरातून मार्गस्थ होणार आहे. 


विठुरायाची आस


वारीत सहभागी होणारे वारकरी बहुतांश शेतकरी असतात. आपल्या शेतातील कामं आटपून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी सज्ज झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीपासूनच वारकरी आळंदीत दाखल व्हायला सुरुवात झाली होती. प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या प्रति असलेलं प्रेम आणि श्रद्धा दिसत होती.