Relationship Tips: कधी कधी लोक म्हणतात, आमचा एकटा जीव सदाशिव..! तर काही लोक म्हणतात, कोणीतरी जोडीदार आयुष्यात हवाच.. अनेकदा लोक म्हणतात की, जे लोक आयुष्यात अविवाहित किंवा एकटे असतात, ते रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांपेक्षा जास्त आनंदी असतात. त्यामागील कारण म्हणजे त्या लोकांना त्यांच्या जोडीदारासाठी किंवा इतर कोणासाठीही वेळ देण्याची गरज नसते. तर काही जण म्हणतात की, जोडीदारासोबतचे आयुष्य हे आनंदी आणि समाधानाचे असते. यात नेमकं सत्य काय? नुकतंच एक संशोधन झालं, ज्यात रिलेशनशिप कि सिंगल? कोणते लोक जास्त आनंदी असतात? याबाबत माहिती समोर आलीय. तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या..
रिलेशनशिप कि सिंगल? कोणते लोक जास्त आनंदी असतात?
पूर्वी अविवाहितांची विचारसरणी अशी होती की, त्यांना रोखणारे कोणी नाही. त्या लोकांना त्यांच्या जोडीदारासाठी किंवा इतर कोणासाठीही वेळ देण्याची गरज नसते. पण नुकतेच झालेले संशोधन काही वेगळेच सांगते, खरे तर इव्होल्युशनरी सायकोलॉजिकल सायन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, समाधानकारक नातेसंबंधात राहणारे लोक एकटे राहणाऱ्यांपेक्षा जीवनात अधिक आनंदी असतात. यामागे भावनिक आधार आहे, जो अविवाहित लोकांना मिळत नाही.
12 देशांतील 6,338 लोकांवर संशोधन. हे संशोधन काय म्हणते?
हे संशोधन चीन, इजिप्त, ग्रीस, जपान आणि यूकेसह 12 देशांतील 6,338 लोकांसोबत करण्यात आले. सहभागींनी रिलेशनशिपमधील, विवाहित, पसंतीने अविवाहित, ज्यांना जोडीदार हवा आहे, किंवा शोधण्यासाठी धडपडत आहेत, अशा लोकांवर हे संशोधन करण्यात आले. अलीकडील संशोधनात विविध नातेसंबंधांच्या स्थितींचे प्रतिनिधित्व करण्यात आले. संशोधनात असे आढळून आले की, जे लोक विवाहित किंवा निरोगी नातेसंबंधात आहेत, ते मानसिकदृष्ट्या मजबूत असतात. ते जीवनात समाधानी आहेत आणि खूप आनंदी देखील आहेत, कारण जीवनातील कठीण दिवसांमध्ये ते एकटे नसतात. त्यांना एक जोडीदार आहे, जो त्यांच्या भावना समजून घेण्यास सक्षम आहे. याशिवाय जोडीदार असण्याचा फायदा असा आहे की, त्यांच्यासोबत अशी व्यक्ती असते जिच्यासोबत ते आयुष्यातील गोड क्षण अविस्मरणीय बनवू शकतात.
सिंगल लोक दुःखी का असतात?
दुसरीकडे एकटे राहणारे लोक रात्रंदिवस स्वतःच्याच काळजीत घालवतात. त्यांना एकट्याने भावनिक संघर्षांचा सामना करावा लागतो, ज्यामध्ये दुःख, एकाकीपणा आणि जीवनातील कमी मजा आणि आनंद यांचा समावेश होतो. त्याच वेळी, ज्यांचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे ते देखील सहमत आहेत की, नात्यादरम्यान ते अधिक आनंदी आणि समाधानी होते, परंतु काही कारणांमुळे त्यांना वेगळे होण्यास भाग पाडले जाते.
अविवाहित राहण्याचे सकारात्मक मुद्दे
तज्ज्ञांच्या मते, अविवाहित लोक त्यांच्या स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि वैयक्तिक आनंदाने अधिक समाधानी असतात. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वत:वर प्रेम, त्यांचे छंद आणि करिअर यावर लक्ष केंद्रित करण्याच्या अधिक संधी मिळतात. इतकेच नाही तर ते त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि करिअरच्या वाढीकडे अधिक लक्ष देण्यास सक्षम असतात, ज्यामुळे त्यांना जीवनात अधिक समाधान मिळते.
हेही वाचा>>
Relationship Tips: जोडीदारानं WhatsApp Chat लॉक करणं ब्रेकअपसाठी मोठं कारण? कपल्ससाठी धोक्याची घंटा! रिलेशनशिप तज्ज्ञ म्हणतात...