Relationship Tips: आजच्या युगात WhatsApp Chat सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते. याचे अनेक फायदेही, तितकेच तोटेही आहेत. आजकाल प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप आहे. या ऑनलाइन चॅटिंग प्लॅटफॉर्मने जगाला तंत्रज्ञान आणि कनेक्टिव्हिटीमध्ये खूप मदत केली आहे. व्हॉट्सॲपवर चॅट लॉक करण्याचे जे फीचर आहे, ते सुरक्षिततेसाठी फायदेशीर आहे, पण त्याचा संबंधांवर काही परिणाम होईल का? जाणून घ्या


ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे नात्यात तडा?


आधुनिक आणि तांत्रिक जगात, व्हॉट्सॲप हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे ज्याने लोकांना खूप मदत केली आहे. आजकाल प्रत्येकाच्या फोनमध्ये व्हॉट्सॲप आहे. कदाचित या ॲपशिवाय काम करणे कठीण आहे. व्हॉट्सॲपच्या मदतीने नातेही घट्ट झाले आहे, जर दोन पार्टनर कॉलवर एकमेकांशी बोलू शकत नसतील तर या चॅटिंग ॲपच्या मदतीने ते 24 तास एकमेकांशी कनेक्ट राहतात. परंतु काही प्रकरणांमध्ये, अशा ऑनलाइन प्लॅटफॉर्ममुळे नातेसंबंधांमध्ये तडा गेल्याच्या बातम्या आल्या आहेत. व्हॉट्सॲपवर एक नवीन सेफ्टी लॉक फीचर लॉन्च करण्यात आले आहे, या फीचरमुळे नातेही बिघडू शकते का? जाणून घ्या..


काय आहे व्हॉट्सॲप लॉक फीचर?


या नवीन फीचरच्या मदतीने लोक त्यांच्या खाजगी चॅट लॉक करतात. आम्हाला आमच्या कोणत्याही चॅट सुरक्षित करायच्या असतील किंवा वैयक्तिक चॅट कोणी उघडून पाहू नये असे वाटत असेल, तर लॉक फीचर तुम्हाला या सर्व प्रकारे मदत करते.


हे फीचर कपल्ससाठी डोकेदुखी?


टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, रिलेशनशिप काउंसलर रुची रूह म्हणतात की हे करणे प्रत्येक जोडीदाराची स्वतःची निवड असू शकते परंतु आवश्यक नाही की त्यामागील कथा खरी आणि चांगली असेल. ती म्हणते, जर दोन लोकांमधील नाते मजबूत आणि विश्वासार्ह असेल तर त्यांना घाबरू नये की त्यांचा पार्टनर त्यांच्यापासून काही लपवत आहे की नाही. यातील दुसरी बाजू अशी आहे की, जर विश्वास असेल तर तुम्ही लॉक केलेल्या चॅट देखील वाचू शकता किंवा तुमच्या पार्टनरला बिनदिक्कत विचारू शकता. मात्र, रिलेशनशिप एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की जर चॅट लॉक असेल तर हे देखील सूचित करते की तुमच्या पार्टनरने तुमच्यापासून काही लपवले आहे का?


आपल्या जोडीदाराशी याबद्दल कसे बोलावे?



  • हा एक संवेदनशील विषय आहे, त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी त्याबद्दल बोलताना आरोप करणारा टोन वापरणे टाळा.

  • जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या विषयावर बोलाल तेव्हा अशी वेळ निवडा, जेव्हा तुम्ही दोघेही इतर कोणत्याही गोष्टीत व्यस्त नसाल आणि चांगला मूडमध्ये असाल.

  • संभाषण सुरू करण्यासाठी, तुम्ही थेट प्रश्न विचारू शकतास परंतु वेगळ्या स्वरात, जसे की – माझ्या लक्षात आले आहे की तुम्ही तुमचे काही

  • WhatsApp चॅट लॉक केले आहेत, त्यामुळे आपण यावर काही बोलले पाहिजे का? तुमच्या शब्दांनी हे दाखवले पाहिजे की तुम्हाला त्यांची आणि तुमच्या नात्याची काळजी आहे.

  • जर तुमचा जोडीदार याबद्दल बोलण्यास सहमत असेल तर तुम्हाला तुमची सर्व उत्तरे लवकरच मिळतील. 

  • त्यांनी तुमची विनंती नाकारली, तर तुम्ही यावर प्रतिक्रिया देण्यापासून परावृत्त केले पाहिजे.