Relationship Tips : एखादं नातं जसं फुलतं, तसं जोडीदाराचा विश्वास आणि प्रेमही वाढत जातं, मात्र असे काही लोक असतात, जे फक्त स्वार्थापोटी गरजे पुरतीच जोडीदाराचा वापर करतात. काही वेळेस जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता पण तुम्हाला आनंद किंवा शांती मिळत नाही. तेव्हा अनेकदा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम तर करतो पण खरंच मनापासून प्रेम करतो का? आज आम्ही तुम्हाला रिलेशनशिप तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अशा काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या जाणून घेतल्यानंतर तुमचा जोडीदारही रिलेशनशिपमध्ये तुमचा वापर तर करत नाही ना? हे समजण्यास मदत होईल.
काही नात्यात एकच व्यक्ती प्रेमाने नातं चालवत असते.
अनेक नाती एकतर्फी प्रेमावर आधारित असतात. या नात्यात एक जोडीदार केवळ प्रेमाचा दिखावा करतो, तर दुसरी व्यक्ती आपल्या प्रेमाने नातं चालवत असते. प्रश्न असा आहे की, जर दुसऱ्या जोडीदाराला त्याच्या जोडीदारावर प्रेम नसेल, तर तो नात्यात का आहे? उत्तर सोपे आहे, त्यांना तुमची गरज आहे. ते फक्त त्यांच्या गरजा किंवा त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या प्रेमळ जोडीदारासोबत असतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की नातेसंबंधात तुम्ही एकमेव आहात जो तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमचा जोडीदार कदाचित तुमचा वापर करत असेल तर तुम्ही या शंकेची पुष्टी या मार्गांनी करू शकता.
तुमचा पार्टनर तुमचा रिलेशनशिपमध्ये वापर करत आहे? 'असं' ओळखा..
पैशांची गरज
जर तुम्ही आणि तुमचा जोडीदार कुठेतरी खरेदी किंवा बाहेरगावी गेलात आणि प्रत्येक वेळी तुम्ही खर्चासाठी पैसे देत असाल तर समजून घ्या, की तुमचा पार्टनर तुमच्या आर्थिक सुविधांचा फायदा घेत आहे. हे मुले आणि मुली दोघांनाही लागू होते.
काम असेल तेव्हाच आठवण येते
जर तुमचा जोडीदार फक्त काम असेल तेव्हाच तुमची आठवण काढत असेल आणि इतर प्रसंगी व्यस्त असल्याबद्दल बोलत असेल तर समजून घ्या की तो फक्त तुमचा वापर करत आहे. जर संपूर्ण दिवस गेला पण त्याने तुमची विचारपूस केली नाही किंवा जेव्हा त्याला काम असेल तेव्हा तो फक्त मेसेज किंवा कॉल करतो, तर तुम्हाला या नात्याबद्दल पुन्हा विचार करणे आवश्यक आहे.
संभाषण
जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमच्याशी बोलण्यात रस नसतो, तेव्हा नात्यात काहीतरी गडबड असल्याची चिन्हे दिसतात. हे शक्य आहे की तुमचा जोडीदाराला जास्त बोलायला आवडत नसेल पण जर तो तुमच्यावर प्रेम करत असेल, तर तो कमी बोलत असला तरी तुमचे म्हणणे नक्कीच गांभीर्याने ऐकेल. पण जर तो तुमच्याशी बोलत असेल किंवा बोलत नसेल, पण तुमचे ऐकत नसेल तर हे नाते एकतर्फी आहे असे समजा.
भावनिक गरजा
नात्याचा अर्थ फक्त हँग आउट करणे नाही, तर एकमेकांशी भावनिकरित्या जोडणे देखील आहे. जर तुमचा जोडीदार तुमच्या भावना समजत नसेल, जेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराची सर्वात जास्त गरज असते. पण तो प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्यासोबत नसतो, तर समजून घ्या की त्याला तुमची पर्वा नाही.
हेही वाचा>>>
Relationship Tips : नातेवाईकांचे 'असे' फुकटचे सल्ले, जे पती-पत्नीचं नातं बिघडवू शकतात! दुर्लक्ष कराल, तर शांततेत जीवन जगाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )