Relationship Tips : नातं म्हटलं की त्यात भांडणं, छोटे मोठे वाद आलेच... असं म्हणतात की त्यामुळे तुमचं नातं मजबूत व्हायला मदत होते. रिलेशनशिपमध्ये समस्या, तणाव आणि भांडणांना सामोरे जाणे खूप सामान्य आहे. जवळजवळ सर्वच नात्यांमध्ये असे क्षण येतात जेव्हा नात्यात परिस्थिती चांगली नसते. पण या गोष्टी असूनही काही नाती चांगली असतात तर काहींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र असे का घडते याचा विचार केला आहे का? खरं तर, काही लोकांना वाद किवा तणावानंतर नातं सामान्य करण्याच्या युक्त्या माहित असतात आणि म्हणूनच ते त्यांचे नाते मजबूत ठेवण्यात यशस्वी होतात. जर तुम्हालाही तुमचं नातं जपायचं असेल तर या गोष्टींचा अवलंब करा, जेणेकरून तुमचं नातं मजबूत राहील.
नात्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जायचे?
मनोविश्लेषक डोनाल्ड विनिकॉट सांगतात, कोणतेही मूल त्याच्या दैनंदिन जीवनातील अपयश आणि अडचणींना तोंड देण्यास कसे शिकते, हे त्याचे पालक त्याच्यासाठी तयार केलेल्या वातावरणावर अवलंबून असते. रोमँटिक संबंधांमध्येही गोष्टी फारशा वेगळ्या नसतात. नात्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जायचे ते जाणून घेऊया-
चुका मान्य केल्याने अडचणी दूर होतात
कितीही काळजी घेतली तरी आरडाओरडा करणे, एकमेकांवर टीका करणे, बचावात्मक बोलणे किंवा एकमेकांना घालून पाडून बोलणे, असे वागणे कधी कधी नात्यात आढळते. ज्या स्त्रिया आपले नाते टिकवून ठेवण्याचे गुण जाणतात, त्या कोणत्याही प्रकारच्या वादाची जबाबदारी घेण्यास तयार असतात, जेणेकरून त्या त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारचे अंतर निर्माण होऊ देत नाहीत. अशा महिलांना हे समजते की, त्यांच्यासाठी नातेसंबंध कोणत्याही समस्येपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. हा गुण समस्येचे निराकरण शोधण्यात देखील मदत करते.
नातेसंबंध सुधारण्यासाठी वेळ लागतो
3000 जोडप्यांचा अभ्यास करणाऱ्या डॉ. गॉटमन यांचा असा विश्वास आहे की, कोणताही वाद सोडवण्याचा प्रयत्न केल्याने नातेसंबंध सुधारतील याची खात्री देता येत नाही. बरेच लोक संबंध सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु जोडीदार ऐकू इच्छित नाहीत, तर काही जोडीदार प्रयत्नही करत नाहीत, परंतु जे प्रयत्न करतात ते यशस्वी होतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण येत असेल तर त्याबद्दल जास्त ताण देऊ नका, आणि घेऊही नका. सामान्य राहण्याचा प्रयत्न करा. नात्यातील कटुता कमी व्हायलाही वेळ लागतो.
जोडीदाराशी Attchment
रिलेशनशिपमध्ये जोडीदार एकमेकांशी किती भावनिकरित्या जोडलेले आहेत यावर नातं अवलंबून असते. जर स्त्रिया भावनिक पातळीवर त्यांच्या जोडीदाराशी खोलवर जोडल्या गेल्या असतील तर छोट्या छोट्या फरकांमुळे त्यांच्या नात्यात फारसा फरक पडत नाही.
तुमच्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा महत्त्वाचा
जर एकमेकांशी घट्ट संबंध नसेल आणि समजूतदारपणा फारसा चांगला नसेल, तर छोट्या छोट्या गोष्टींवरून सुरू होणारे वाद वाढू शकतात, ज्यामुळे नात्यात तडा जाऊ शकतो. नात्यात दुरावा असेल, एकमेकांबद्दल आदर नसेल किंवा एकमेकांबद्दल द्वेष असेल तर अंतर कमी करण्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. अशा परिस्थितीत एकमेकांशी असलेले नाते घट्ट करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आवश्यक आहेत.
हेही वाचा>>>
Relationship : फक्त तुम्हीच नाही! ब्रेकअपनंतर अनेकांच्या शरीरात होतात 'असे' बदल, जाणून आश्चर्यचकित व्हाल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )