Relationship Tips : एकदा का मुलीचं लग्न झालं की तिचं अख्खं आयुष्यच बदलून जाते. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात अनेक बदल होतात. आपलं घर सोडणं आणि नवीन घर स्वीकारणं कधीकधी कठीण असतं. नवीन घर, नवीन माणसांना आपलंस करताना काही वेळेस सासरच्यांशी संबंध बिघडू लागले तर नातेसंबंधात अडचणी आणखी वाढतात. तुम्हालाही तुमच्या सासऱ्यांच्या मंडळींसोबत चांगले संबंध निर्माण करायचे असतील, तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील.



लग्नानंतर हे सर्वात मोठे आव्हान..!


लग्नानंतर पतीसोबत संपूर्ण कुटुंबाशी जुळवून घेणे हे सर्वात मोठे आव्हान असते. तुम्ही तुमच्या भावना तुमच्या पतीसोबत शेअर करू शकता आणि परिस्थिती अनुकूल बनवू शकता, परंतु जर तुमचे विचार तुमच्या सासू किंवा नणंदशी जुळत नसतील तर त्यांच्यासोबत जुळवून घेण्यात काही अडचण येऊ शकते. अशात, शहाणपणा दाखवून आणि संतुलन राखून, तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवू शकता. सासरच्या लोकांशी तुमचे संबंध कसे सुधारायचे ते जाणून घ्या..



तुमची मर्यादा ठरवा


सासरचे लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुम्ही ठरवलेल्या मर्यादांवर अवलंबून आहे. तुमच्या चिंतेत असलेल्या मुद्द्यांवर तुम्ही तुमचे वैयक्तिक निर्णय घेऊ शकता, मग ते तुमच्या मुलांचे संगोपन करण्याचे असो किंवा नोकरी करण्यासाठी असो.. इथे तुमची मर्यादा ठरवा. तुमची मतं सौम्य आणि स्पष्ट शब्दात व्यक्त करा, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हा निर्णय घ्यायचा आहे. हे एक किंवा दोनदा वाईट वाटू शकते, परंतु दीर्घकाळासाठी या पर्यायासह एकत्र राहण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.


 


तुमच्या जोडीदाराला वादामध्ये आणू नका


तुमच्या जोडीदाराला तुमच्या वादामध्ये पडू देऊ नका. थेट बोला, पण लक्षात ठेवा की ते तुमच्या जोडीदाराचे पालक आहेत आणि त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. तुमचा आवाज कमी ठेवा, तुमची बाजू ठामपणे मांडा, तुम्हाला काय वाटते, तुम्ही आजवर कोणते आयुष्य जगले आणि परिस्थिती कशी हाताळली हे त्यांना समजावून सांगा. मात्र जोडीदाराची ढवळाढवळ टाळा. यामुळे, तुमचा जोडीदार या कठीण परिस्थितीच्या आघातातून वाचेल आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार समस्या सोडवू शकाल.



एक चांगला श्रोता व्हा


मोठ्यांना महत्त्व देऊन त्यांचे मत घ्या आणि त्यांचे अनुभव विचारा. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे तुमचा विजय दर्शवत नाही तर तुमची छोटी मानसिकता दर्शवते. तुमची मतं त्यांच्या मतांशी नक्कीच जुळणार नाहीत, कारण तुमच्या दोघांचे पालनपोषण आणि कुटुंब भिन्न आहे. अशा परिस्थितीत, आपले मत लादण्याऐवजी, त्यांचे ऐका आणि शेवटी आपला मुद्दा स्पष्ट करा. यासह, तुमची सासरची मंडळी तुमचे लक्षपूर्वक ऐकतील आणि तुम्हाला व्यत्यय आणणार नाहीत. तरीही ते पटत नसेल तर काही काळ त्या ठिकाणाहून दूर जा. उगाच वाद घालून तुमचा मुद्दा सिद्ध करता येत नाही.


 


आरोग्याची काळजी घ्या


सासरच्या लोकांच्या तब्येतीची जरूर काळजी घ्या. ते सु्द्धा आपल्या आई-वडिलांप्रमाणे म्हातारपणाच्या वाटेवर आहेत. अशा स्थितीत त्यांची सेवा करा. आरोग्य लाभ मिळाल्याने ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळतो. तुमच्या बाजूने, त्यांच्या खाण्यापिण्यात आणि आरोग्याशी संबंधित सेवांमध्ये कोणतीही तफावत ठेवू नका.


 


आपल्या मानसिक स्थितीची काळजी घ्या


सर्व पद्धतींचा अवलंब करूनही तुमची सासरची मंडळी तुमच्याशी गैरवर्तन करत असतील, तर तुमच्या कुटुंबियांसोबत याचा गांभीर्याने विचार करा आणि मिळून तोडगा काढा. मनातल्या गोष्टी मनात ठेवून आपली मानसिक स्थिती बिघडू नका.


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : 'सर्वांनांच तुम्ही आनंदी नाही ठेवू शकत.. समजून घ्या..!' 'ही' सवय मानसिक आरोग्यासाठी घातक?


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )