Relationship Tips : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं! हे तर सर्वांनाच माहित आहे. पण प्रेमात जर काही नकारात्मक गोष्टी निदर्शास येत असतील, तर ते नातं मारून मुटकून पुढे नेण्यात काही अर्थ आहे का? प्रत्येक नात्याचे काही गुण आणि तोटे असतात. अशा नात्यात प्रेमासोबतच (Love) दोन व्यक्तींमध्ये भांडणं होतात, दोघानांही राग येतो. अशा प्रकारची समस्या कोणत्याही नात्यात सामान्य मानली जाते. पण अनेकदा लोकांना हेच कळत नाही की ते नाते बरोबर आहे की अयोग्य? यामुळे लोकांना नंतर त्या नात्यातून बाहेर पडणे खूप कठीण होते. आज आम्ही तुम्हाला अशाच 5 लक्षणांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्हाला कळेल की, तुम्ही चुकीच्या नात्यात राहत आहात. जाणून घेऊया सविस्तर
छोट्या छोट्या गोष्टींवर तू-तू मी-मी
तुम्ही चुकीच्या नात्यात राहात आहात याचे पहिले लक्षण म्हणजे सतत मतांचा संघर्ष. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा जोडीदार तुमच्याशी प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीवर वाद घालत असेल तर तुमचे नाते तुम्हाला वाटते तितके परफेक्ट नाही याचे हे लक्षण आहे. कोणतेही निरोगी नाते तुमच्यातील संवाद आणि विश्वासावर बांधले जाते
इमोशनल ब्लॅकमेल
स्वत:साठी कोणताही नवीन निर्णय घेताना तुमचा पार्टनर तुम्हाला भावनिकरित्या म्हणजेच इमोशनल ब्लॅकमेल करतो असे तुम्हाला वाटत असेल. किंवा तुम्ही स्वतःसाठी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, तर तुम्ही चुकीच्या नात्यात जगत आहात हे लक्षण आहे. निरोगी नात्यात, समोरची व्यक्ती तुमच्या प्रत्येक निर्णयाचा आदर करते. यामुळे तुमचे नाते सुधारतेच पण तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही वाढ होते.
समोरच्या व्यक्तीला बांधून ठेवण्याची इच्छा
तुमच्या जोडीदारालाही तुमच्या हुकुमावर नाचवायचे आहे का? काही लोकांना नात्यात या गोष्टी अगदी सामान्य वाटतात आणि त्यांच्या जोडीदाराच्या आनंदासाठी ते असे बनलेले असतात असे त्यांना वाटत असते. निरोगी नाते हे असे असते ज्यामध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराची ओळख बदलण्याचा प्रयत्न करत नाही, तर ते जसे आहेत तसे त्यांच्यावर प्रेम करा.
भावनिक असंतुलन आणि भीती
तुम्हालाही तुमच्या नात्यात असंतुलन आणि भीती वाटते का? तुम्ही चुकीच्या नात्यात आहात याची ही चिन्हे आहेत. तुम्हालाही एकटे राहण्याची किंवा तुमचा जोडीदार सोडून जाण्याची भीती वाटत असेल, तर तुम्ही या गोष्टींपासून एक पाऊल मागे घेणे महत्त्वाचे आहे. निरोगी नातेसंबंधात, लोक आनंदी असतात आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे होण्याची भीती किंवा चिंता नसते. तसेच, उत्तम नातेसंबंधात राहणारे लोक एकमेकांशी समाधानी असतात.
आरोग्यावर वाईट परिणाम
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असताना आनंदी नसाल आणि तुम्हाला दररोज कोणत्या ना कोणत्या आरोग्याशी संबंधित आजाराचा सामना करावा लागत असेल तर हे तुम्ही चुकीच्या नात्यात असल्याचे लक्षण आहे. निरोगी नातेसंबंधात, माणूस आतून आनंदी राहतो, ज्याचा प्रभाव त्याच्या संपूर्ण शरीरावर दिसून येतो.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>