Red Wine For Skin : आजकाल रेड वाईन (Red Wine) पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. याचं कारण म्हणजे अनेकदा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, मित्र-मंडळींकडून ऐकतो की रेड वाईन प्यायल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे पिंपल्स आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय हे बॅक्टेरिया कमी करण्यासही मदत करते.


काही लोक असेही म्हणतात की, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होण्यास मदत होते. वाईनच्या तुलनेत त्यात अल्कोहोल कमी प्रमाणात असते. रेड वाईन त्वचेसाठी खरंच फायदेशीर ठरू शकते का? यावर आरोग्य तज्ज्ञांचं नेमकं मत काय आहे ते जाणून घेऊयात. 


तज्ञ काय म्हणतात?


दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील त्वचाविज्ञान विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. डी.एम. महाजन सांगतात की, यामध्ये रेझवेराट्रोल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करतात. या अँटीऑक्सिडंटच्या दाहक-विरोधी गुणधर्मामुळे त्वचेमध्ये कोलेजन तयार होते, ज्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते.


पण 'हे' लक्षात ठेवा


याबरोबरच डॉ. डी. एम. कोणत्याही गोष्टीचे जास्त प्रमाण चांगले नसते, असेही आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. रेड वाईन निःसंशयपणे त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. पण, रेड वाईन जास्त प्रमाणात प्यायल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने निर्जलीकरण (डिहायड्रेशन) आणि जळजळ होऊ शकते.


'अशा' प्रकारे वापरा


रेड वाईन पिण्याबरोबरच याचा चेहऱ्यासाठी देखील तुम्ही वापर करू शकता. खरंत रेड वाईनने तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता. जर तुम्हाला पिंपल्स किंवा मुरुमांची समस्या वारंवार भेडसावत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी कॉटन बॉल रेड वाईनमध्ये बुडवून मुरुमांवर लावा. रेड वाईन त्वचेवर 15-20 मिनिटं सोडा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. पण, जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लोहवा असेल किंवा त्वचेच्या संबंधित समस्या टाळायच्या असतील तर रेड वाईनचा वापर करण्याआधी नक्कीच त्वचा रोग तज्ज्ञांशी संपर्क साधा आणि त्यांचा सल्ला घ्या. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या