Bamboo Toothbrush vs Plastic Toothbrush: तोंडाची स्वच्छ करण्यासाठी टुथब्रशचा वापर केला जातो. तोंड व्यवस्थित स्वच्छ केलं नाही तर तोंडातून वास यायला सुरूवात होते. इतकंच नाही तर हिरड्यांमधून रक्तसुद्धा येतं. वेळीच या समस्या टाळण्यासाठी योग्य टुथब्रशची निवड करणं गरजेचं असतं.  सध्या बाजारात बांबू टूथब्रश पाहायला मिळतात. पर्यावरणाच्या वाढत्या समस्या पाहता प्लास्टिक टूथब्रशऐवजी (Plastc Toothbrush) आणि बांबू टूथब्रशला पसंती देत आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला प्लास्टिक आणि बांबूच्या  टुथब्रशचे फायदे  सांगणार आहोत.


 बांबूपासून बनवलेला टूथब्रश इको फ्रेंडली


भारतात  बांबूला (bamboo)अतिशय महत्त्व आहे. प्लास्टिक हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. बांबूपासून बनवलेला टूथब्रश इको फ्रेंडली टूथब्रश  (Eco Friendly Toothbrush)मानला जातो. बांबू टूथब्रशचे हँडल बांबूचे बनलेले आहे आणि त्याचे ब्रिस्टल्स (Bristles) नायलॉन किंवा इतर नॅचरल फायबरने बनलेले असतात. बांबू टूथब्रश देखील प्लास्टिकच्या टूथब्रशप्रमाणेच आहे, तो बनवण्यासाठी फक्त बांबूचा वापर केला जातो.


प्लास्टिक लवकर नष्ट होत नाही


एका अभ्यासानुसार, जगात दरवर्षी 44.8 कोटी टनांपेक्षा जास्त प्लास्टिकचे ब्रश तयार होतात. प्लास्टिक ब्रशमुळे पर्यावरणाला खूप नुकसान होते.  हजारो वर्षे प्लास्टिक नष्ट होत नाही. प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्यानं केला, तर मात्र त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच, यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचण्याचा धोका आहे. 


बांबू आणि प्लास्टिक ब्रशमधील फरक 


लोकांना असे वाटते की बांबू टूथब्रश नवीन आहे, परंतु प्रत्यक्षात तो टूथब्रशचा जुना प्रकार आहे. आजकाल टूथब्रश ब्रिस्टल्स बनवण्यासाठी नायलॉन किंवा  नॅचरल फायबरचा वापर करण्यात येतो. प्लास्टिकच्या तुलनेत हे स्वस्त देखील आहेत  बांबू टूथब्रश हे सर्व नैसर्गिक आणि बायोडिग्रेडेबल आहेत. पूर्वी हे ब्रिस्टल्स डुकराच्या केसांपासून बनवले जायचे. दात व्यवस्थित स्वच्छ व्हावेत म्हणून काही टूथब्रशच्या ब्रिस्टल्समध्ये कोळसाही टाकला होता.  ब्रश वापरण्यापूर्वी आपल्या डेटिंस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :