Pitru Paksha 2022 : हिंदू धर्मात पितृपक्षाला (Pitru Paksha 2022) विशेष महत्त्व आहे. पितृपक्षात पूर्वजांचे पूर्ण भक्तीभावाने स्मरण केले जाते आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. असे मानले जाते की, पितृपक्षात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्षात पिंड दान आणि श्राद्ध हे पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात. हे केल्यानं पूर्वज प्रसन्न होऊन आपल्या वंशजांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.
पितृपक्ष पंधरवडा हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो. पुढे तो 15 दिवस चालतो. या दिवसात काही गोष्टी करु नयेत, असं म्हणलं जातं. या गोष्टी केल्यानं पूर्वज नाराज होऊ शकतात. जाणून घेऊया पितृ पक्षात कोणती कामे करू नयेत.
पितृपक्षात या 5 गोष्टी करू नयेत-
- पितृपक्षामध्ये 15 दिवस घरात सात्विक वातावरण असावे. या काळात घरात मांसाहार बनवू नये. शक्य असल्यास या दिवसात लसूण आणि कांदा देखील खाऊ नये.
- पितृपक्षात श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीने 15 दिवस केस आणि नखे कापू नयेत. यासोबतच या लोकांनी ब्रह्मचर्याचे पालन करावे.
- असे मानले जाते की पितृ पक्षाच्या काळात पूर्वज पक्ष्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. त्यामुळे या काळात पक्ष्यांना त्रास देऊ नये. पितृपक्षात पशु-पक्ष्यांची सेवा करावी.
- पितृपक्षाच्या काळात केवळ मांसाहारच नव्हे तर काही शाकाहारी पदार्थ खाणे देखील टाळावे. या दिवसात काकडी, हरभरा, जिरे आणि मोहरी, हिरव्या भाज्या खाऊ नयेत.
पितृपक्षात कोणतेही शुभ कार्य करू नये. पितृ पक्षात लग्न, साखरपुडा आणि गृहप्रवेश यांसारखे शुभ कार्य करु नयेत. पितृपक्षात शोकाचे वातावरण असते, त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते.
यावर्षी पितृपक्ष 10 सप्टेंबरला सुरू होऊन 25 सप्टेंबरपर्यंत आहे. शास्त्रानुसार पिंडदान आणि ब्राह्मणभोज अर्पण करून पितरांचे श्राद्ध करावे. ब्राह्मणांना श्राद्धात आदरपूर्वक बोलावून त्यांचे पाय धुवून त्यांना आसनावर बसवावे. ब्राह्मण भोजनाबरोबरच पंचबली भोजनाला विशेष महत्त्व आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Pitru Paksha 2022 : कधीपासून सुरु होतोय पितृपक्ष पंधरवडा? जाणून घ्या पूजा, विधी आणि महत्त्व- Swapna Shastra: ही 3 स्वप्ने कोणाला सांगू नयेत, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान