Home Made Peel Off Mask : बाजारातून पील ऑफ मास्क खूप महाग मिळतात, मात्र हेच पीलऑफ मास्क तुम्ही आता घरीच बनवू शकता. हे मास्क बनवायचे कसे जाणून घेऊया. स्किन केयर रूटीनमध्ये पीलऑफ मास्क खूप जास्त महत्व आहे. प्रामुख्याने याचा वापर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी केला जातो. चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि ब्लॅकहेड्स काढण्यासाठी याचा वापर केला जातो. बाजारात मिळणाऱ्या पीलऑफ मास्क मध्ये अनेक केमिकलचा वापर केलेला असतो. ज्याचे स्किनला खूप नुकसान होऊ शकते. घरी बनवलेले पीलऑफ मास्क हे कोणत्याच प्रकारचे स्किनचे नुकसान करत नाही.
पीलऑफ मास्क वापरण्याचे फायदे (Benefit Of Peel Off Mask)
1. त्वचा हायड्रेट आणि मऊ ठेवण्यासाठी पीलऑफ मास्कचा वापर केला जातो. डेड स्किन सेल्स या मास्कच्या मदतीने काढले जाऊ शकतात. तसेच चेहऱ्यावरील बंद छिद्र ओपन करण्यास मदत करतात.
2. पीलऑफ मास्कचा वापर चेहऱ्यावरील घाण काढण्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावर तयार होणारे तेल देखील काढले जाते आणि नॅचरल ग्लो मिळण्यास मदत होते.
3. पीलऑफ मास्कमुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा नरम होते.
चारकोल पीलऑफ मास्क
सामग्री
एक मोठा चमचा चारकोल पावडर
एक मोठा चमचा मुलतानी माती
एक मोठा चमचा जिलेटिन
एक मोठा चमचा पाणी
चारकोल पीलऑफ मास्क कसा बनवावा? (How To Make Charcoal Peel Off Mask)
एका मोठ्या वाटीत एक मोठा चमचा चारकोल पावडर, एक मोठा चमचा मुलतानी माती एक मोठा चमचा जिलेटिन आणि एक मोठा चमचा पाणी एकत्र घेऊन ते मिक्स करा. त्याची पेस्ट तयार होणार नाही तोपर्यंत ते मिक्स करत राहवा. तयार झालेला मास्क 15 ते 20 मिनीट चेहऱ्यावर ठेवून हळूहळू तो मास्क काढून टाका.
कॉफी पीलऑफ मास्क
सामग्री
एक चमचा कॉफी पावडर
एक चमचा जिलेटिन
एक चमचा मध
पाणी
कॉफी पीलऑफ मास्क कसा बनवावा? (How To Make Coffee Peel Off Mask)
एका मोठ्या वाटीत एक चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात एक चमचा जिलेटिन , एक चमचा मध आणि पाणी मिक्स करा. त्याची पेस्ट तयार करा. 15 ते 20 मिनीट चेहऱ्यावर ठेवून हळू हळू तो मास्क काढून टाका.
कॉफी मास्क चेहऱ्याला लावण्याचे फायदे (Benefits Of Coffee Peel Off Mask)
कॉफी मास्कमुळे चेहऱ्याचा रंग उजळतो. डेड स्किन सेल्स निघून जात असल्याने चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. कॉफीमध्ये अँटFआॅक्सीडंट असल्याने त्वचा तजेलदार बनते.
इतर महत्वाच्या बातम्या