Parenting Tips : पालक होणे ही एक आनंददायी भावना आहे. हा क्षण प्रत्येक व्यक्तीसाठी खूप खास असतो. तसेच, पालक (Parenting Tips) झाल्यानंतर काही जबाबदाऱ्या येतात. ज्या कधी कधी पूर्ण करणे कठीण होते. पालकत्व हा कोणत्याही पालकांसाठी सोपा प्रवास नाही. मुलाचे लाड, प्रेम, आपुलकी यामुळे अनेक वेळा आपल्याच चुकांमुळे मूल हट्टी होते. यानंतर त्यांना सांभाळणं खूप कठीण होऊन बसते. त्यामुळे पालकांना काही वेळा कठोर व्हावे लागते. यात दोष खरंतर मुलांचा नाही तर पालकांचा आहे. मुलांचे अति लाड करणे, हव्या ते गोष्टी वेळेत देणे यामुळे मुले हट्टी होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्या पालक करतात. कारण यामुळे तुमचे मूल हट्टी होते.


'या' चुका पालकांनी कधीही करू नये 


मुलांवर दबाव आणू नका


जेव्हा आपण आपल्या मुलांवर कोणतीही गोष्ट करण्याचा दबाव आणतो तेव्हा ते काम करू नये या इच्छेने मुलं अधिक हट्टी होतात. अशा मुलांवर कोणत्याही गोष्टीसाठी दबाव टाकणे केवळ पालकांसाठी तसेच मुलांसाठी हानिकारक ठरेल. 


व्यत्यय आणू नका


जर तुमचं मूल तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकायला शिका. त्यांच्या गोष्टीत वेळोवेळी व्यत्यय आणणे ही खूप वाईट सवय आहे. ही सवय मुलाला हट्टी बनवू शकते. तुम्ही मुलाला त्याच्या वयानुसार समजावून सांगू शकता. तो नक्कीच तुमचे ऐकेल. प्रेमाने समजावलेल्या गोष्टी अनेकदा मुलं ऐकतात. 


तुमच्या मुलाची इतरांशी तुलना करू नका  


प्रत्येक मुलाचे स्वतःचे वेगळे गुण असतात. पण, बऱ्याचदा पालकांना आपल्या मुलाची इतरांशी तुलना करण्याची सवय असते. पालकांच्या या सवयीमुळे मूल हट्टी होऊ शकते.


मुलांच्या भावनांना महत्त्व द्या


जेव्हा मुलांच्या विचारांना किंवा भावनांना महत्त्व दिले जात नाही. तेव्हा मुलं हट्टी होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमचे मूल काही बोलले किंवा काहीतरी शेअर करायचे असेल तर त्याचे ऐकून त्यावर मार्ग काढणे फार गरजेचे आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Parenting Tips : तुमचं बाळ वारंवार रडत असेल तर वेळीच लक्ष द्या; 'ही' 5 कारणे फक्त आजार असू शकत नाहीत