Weight loss Onion Benefits : वजन कमी (Weight loss) करण्यासाठी अनेक लोक डाएट फॉलो करतात. तसेच काही लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊ एक्सरसाइज करतात. आता घरबसल्या वजन कमी करायचं असेल तर आहारात कांद्याचा (Onion) समावेश करा. कांद्याचे सेवन केल्यानं तुमचे वजन कमी होऊ शकते. जाणून घेऊयात कांदा खाण्याचे फायदे....


कांदा खाण्याचे फायदे
फायबर-
कांद्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते.  एक कप चिरलेल्या कांद्यामध्ये जवळपास तीन ग्रॅम फायबर असते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही कांद्याचा समावेश करु शकता. कांद्यामध्ये असणारे सॉल्यूबल फाइबर हे क्रेविंग कमी करते. त्यामुळे तुमचे वजन वाढणार नाही. 


लो कॅलरी-
कांद्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. एक कप चिरलेल्या कांद्यामध्ये जवळपास  64 कॅलरी असतात. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे ते कांद्याचे सेवन करु शकतात. 
 
अँटी ओबेसिटी प्रॉपर्टी-
कांद्यामध्ये क्वेर्सेटिन नावाचे वनस्पतीसारखे गुणधर्म आहेत. हे एक फ्लेव्होनॉइड आहे ज्यामध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहिल. 


 कांद्यापासून तयार करा या टेस्टी रेसिपी


ओनियन ज्युस
ओनियन ज्युस तयार करण्यासाठी, सोललेली लहान कांदा 1 कप पाण्यात उकळवा आणि त्याचे चौकोनी तुकडे करा. ते थंड होऊ द्या आणि 1 कप पाणी घालून मिक्स करा. हा रस एका ग्लासमध्ये टाकून प्या.

कांद्याचे सूप
एका पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल आणि दोन लसुन टाकाय त्यानंतर दोन चिरलेले कांदे टाका. त्यानंतर आर्धा कप तुम्हाला आवडतील त्या भाज्या त्यामध्ये टाका. 2-5 मिनीट हे मिश्रण गॅसवर ठेवा. त्यानंतर यामध्ये थोडं पाणी मिक्स करुन त्यामध्ये मिठ आणि मिर्ची टाका. हे सूप गरम असताना प्या. 


हेही वाचा: