बंगळुरु: भारतीय लग्न समारंभात लग्नपत्रिकांना विशेष महत्त्व असतं. या मंगल समयी नव वधू-वरांना अशीर्वाद देण्यासाठी वधू-वरांचे कुटुंबिय आपल्या ज्ञाती बांधवांना लग्नपत्रिकेद्वारे आमंत्रित करतात.

सध्याच्या काळात तर या लग्नपत्रिका अधिकाधिक आकर्षक बनवण्याकडे अनेकांचा कल असतो. यासाठी ते खर्चाचीही पर्वा करत नाहीत. कारण एकप्रकारे त्यांना लग्नपत्रिकेच्या माध्यमातून आपली प्रतिष्ठा दाखवायची असते.

अशा प्रकारची लग्नपत्रिका बंगळुरुच्या विवाह इच्छुकांच्या कुटुंबियांनी बनवली आहे. ही लग्नपत्रिका अतिशय हटके आहे. कारण यामध्ये तंत्रज्ञानाचाही पुरेपुर वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकारची लग्नपत्रिका तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल.

हे लग्नपत्रिका कर्नाटकातील माजी मंत्री आणि प्रसिद्ध उद्योगपती जनार्दन रेड्डींची मुलगी ब्राम्हणीच्या लग्नाची आहे. ही पत्रिका एका छोट्याशा बॉक्समध्ये असून, हा बॉक्स उघडल्यानंतर यातील एलईडी स्क्रीन ऑन होते.  यानंतर एखाद्या सिनेमाच्या ट्रेलरप्रमाणे, वर-वधू त्या एलईडी स्क्रीनवर दिसतात. यानंतर वधूचे वडील जनार्दन रेड्डी आणि त्यांची पत्नी 'अतिथी देवो भव' गात ज्ञाती बांधवांना आमंत्रित करतात. हा एक मिनीटांचा व्हिडिओ पाहताना एखादा कौटुंबिक सिनेमाचा ट्रेलर पाहात असल्यासारखेच वाटते.

जनार्दन रेड्डींची कर्नाटकातील सर्वात बलाढ्य व्यक्तींमध्ये गणना होते. ते आणि त्यांचे बंधू करुणाकर रेड्डी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या मंत्रीमंडळात मंत्री होते. पण, अवैध खाणकामप्रकरणात त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. रेड्डींची गेल्याच वर्षी जामीनावर मुक्तता करण्यात आली.

व्हिडिओ पाहा