New Year 2024 : येत्या काही दिवसांत 2024 (New Year 2024) सुरू होणार आहे. नवीन वर्ष प्रत्येकासाठी आशेचा किरण घेऊन येतं. नवीन वर्षाच्या आधी, लोक आपल्या जीवनात बदल करण्यासाठी अनेक संकल्प करतात. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्हाला नवीन वर्षात निरोगी राहण्यास मदत करतील.


येत्या वर्षभरात तुम्हालाही निरोगी राहण्यासाठी तुमच्या काही सवयी बदलायच्या असतील, तर चला जाणून घेऊयात कोणत्या सवयी बदलून तुम्ही निरोगी राहू शकता.


वेळेवर झोप घ्या 


आजकाल लोकांच्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या वेळा पूर्णपणे बदलल्या आहेत. ते रात्री उशिरा झोपतात आणि जेवण उशिरा करतात. अशा स्थितीत हे देखील आजारांचे एक मोठे कारण ठरू शकते. त्यामुळे सर्वात आधी सर्व कामे करण्याची सवय लावा. वेळेवर झोपा तसेच 8 तासांची झोप घ्या.


तणाव मॅनेजमेंट करा


आजच्या काळात, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावात आहे. पण, काही लोक त्या समस्येबद्दल खूप काळजी करतात. त्यामुळे त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या असू शकतात. म्हणून, तुमचा तणाव व्यवस्थापित करण्यासाठी, तुम्ही ध्यान आणि माइंडफुलनेस यासारख्या तणाव व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब केला पाहिजे.


व्यायाम करा 


शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी शरीर सक्रिय ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी रोज व्यायाम करण्याची सवय लावावी. यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक, व्यायाम, योग किंवा डान्स क्लास यांसारखे उपक्रम करू शकता.


योग्य खाण्याच्या सवयी लावा 


आजकाल लहान मुले असो वा तरुण, जंक फूड आणि पॅक्ड केलेले पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. पण, ते तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते. त्यामुळे या वर्षापासून घरचे बनवलेले पदार्थ आणि सकस अन्न खाण्याची सवय लावा.


वाचन करा 


तुम्ही दिवसाला कितीही व्यस्त असाल पण वाचनासाठी किमान दिवसातून थोडा वेळ काढून पुस्तके वाचली पाहिजेत. यातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. याबरोबरच तुमचे विचार आणि तुमचा पुढच्या वर्षीच प्लॅन, अनेक योजना यांचे वेळापत्रक डायरीत लिहावे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय