Patties Recipe : आजपासून नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सव आणि उपवास एक वेगळचं समीकरण आहे. या दिवसांत अनेक मंडळी नऊ दिवस उपवास करत असतात. नऊ दिवसांत साबुदाण्याचे पदार्थ खाऊन कंटाळ येतो. तर आज जाणून घ्या उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस (Patties Recipe) बनवण्याची रेसिपी...


'उपवासाचे बटाटा पॅटीस' बनवण्यासाठी लागणारे साहित्य - 



  • खोवलेला नारळ - पाच चमचे

  • शेंगदाण्याचे कूट - तीन चमचे

  • कोथिंबीर - तीन चमचे

  • मसाल्याचं वाटण - एक चमचा

  • लिंबाचा रस - एक चमचा

  • मीठ - चवीप्रमाणे

  • उकडलेले बटाटे - तीन-चार

  • तेल - तळण्यासाठी

  • एरोरुटचं पीठ - तीन चमचे


'उपवासाचे बटाटा पॅटीस' बनवण्याची कृती - 


- 'उपवासाचे बटाटा पॅटीस' बनवण्याआधी सारण बनवणं गरजेचं आहे. एका भांड्यात खोवलेला नारळ, शेंगदाण्याचं कूट, मसाल्याचं वाटण, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि मीठ घालून ते मिसळून घ्या.


- दरम्यान एका भांड्यात उकडलेल्या बटाट्याच्या बारिक बारिक फोडी करुन घ्या. 


- एरोरुटच्या पीठात मीठ घालून ते मिसळून घ्या.


- आता आपल्या हातावर बटाट्याचे मिश्रण घ्या आणि त्याला हातानेच पुरीचा आकार द्या.


- पुरीच्या आकारात नारळाचे सारण भरा आणि गोलाकार करा. 


- अशाप्रकारे सर्व गोळे तयार करून त्या बॉलच्या आकाराचे गोळे एरोरूटच्या पिठामध्ये रोळून घ्या.


- दरम्यान कढईत तेल टाकून त्यात बटाट्याचे गोळे हळुवार सोडा.


- आता या तळलेल्या पॅटिसांना टिशू पेपर वर काढून ठेवा.


- चविष्ट गरम उपवासाचे बटाटा पॅटीस खाण्यासाठी तयार.


- चविष्ट गरम उपवासाचे बटाटा पॅटीस हिरवी चटणी आणि दहीसोबत चविष्ट लागतात. 


उपवास करताना काय काळजी घ्यावी?


- नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे. 


- आजारी असल्यास उपवास करणे टाळावे. 


- गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा. 


- आपल्या क्षमतेचा विचार करुन उपवास करण्याचा निर्णय घ्यावा. 


- उपवास करताना व्यसन करू नये. 


- उपवासादरम्यान फळे आणि दुधाचं सेवन करावं. 


संबंधित बातम्या


Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळलात? जाणून घ्या चटकदार उपवासाच्या मिसळीची रेसिपी


Navratri Recipe : नवरात्रीला नऊ दिवस उपवास करता? आरोग्याची घ्या अशी काळजी, जाणवणार नाही अशक्तपणा