जगभरात सेलिब्रेशन करता येतील अशा दिवसांची काही कमी नाही. भारताला तर उत्सवांचाच देश म्हटलं जातं. आज राष्ट्रीय बॉयफ्रेंड दिवस आहे. नॅशनल बॉयफ्रेंड डे दरवर्षी 3 ऑक्टोबरला साजरा करण्यात येतो. काय आहे या दिवसाचं महत्व? कधीपासून सुरु झाला? चला तर मग जाणून घेऊया.


नॅशनल बॉयफ्रेंड दिवस पहिल्यांदा 2014 साली साजरा करण्यात आला. मात्र, तो फेमस झाला 2016 साली. तसं म्हटलं तर प्रेम करणाऱ्यांसाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. त्यातही प्रेमवीर काही खास दिवसांची वाट पाहत असतात. जसं की व्हेलन्टाईन डे. हा दिवस दोघांनीही आपल्या जोडीदाराविषयी प्रेम व्यक्त करण्याचा आहे. पण, नॅशनल बॉयफ्रेंड दिवस हा फक्त प्रियकरासाठी आहे. या दिवशी प्रेयसी आपल्या प्रियकराविषयी प्रेम व्यक्त करते. त्या आवडतील अशा भेटवस्तूही दिल्या जातात.


आपल्या बॉयफ्रेंडला काय भेट द्याल?


पुस्तकं
सध्याच्या 4G काळात प्रत्येकजण मोबाईलच्या स्क्रिनला चिकटलेला पाहायला मिळतो. याचे फायदे कमी आणि तोटे जास्त आहे. अशा काळात तुम्ही जर तुमच्या बॉयफ्रेंडला पुस्तकं भेट दिली तर त्याला वाचनाची आवड लागू शकते. यामुळे त्याच्या ज्ञानात भर तर पडेलचं मात्र मोबाईलच्या दुष्परिणांमापासूनही दूर राहिल. तुमची आठवण नेहमी बॉयफ्रेंडकडे पुस्तकाच्या रुपात राहिल.


फिटनेस बँड
प्रत्येकाला वाटतं की आपला बॉयफ्रेंड हा फिट आणि तंदरुस्त असावा. याची आठवण करुन देण्यासाठी तुम्ही त्याला फिटनेस बँड देऊ शकता. यामुळे बॉयफ्रेंडला व्यायामाची आवड निर्माण होईल. साहजिकच याचा परिणाम म्हणून तो निरोगी राहिल.


टी शर्ट
बॉयफ्रेंडला आपल्या आवडीचा टी-शर्ट भेट म्हणून देऊ शकता. तुमची ही भेट त्याला नक्कीच आवडेल. तुम्ही सोबत नसताना हा टी शर्ट नेहमी तुमची आठवण बॉयफ्रेंडला करुन देईल.


बॉयफ्रेंडची आवड ओळखा


आपल्याला काय आवडतं यापेक्षा आपल्या जोडीदाराला काय आवडतं याचा अधिक विचार करा. त्याला एखादी साधी गोष्ट जरी आवडत असली तरी तीच त्याला द्या. महागड्या वस्तू देण्याच्या भानगडीत पडू नका. तुमचे पैस तर जातीलचं मात्र बॉयफ्रेंडला हे आवडणार नाही.