Indian Wedding Ceremony : तुळशी विवाहानंतर (Tulsi Vivah) भारतात सनई-चौघडे वाजायला सुरुवात होते. साधारण ऑक्टोबर ते मे महिन्यापर्यंत हे लग्नसराईचे (Indian Wedding Ceremony) दिवस सुरु असतात. लग्न म्हटलं की, त्यात अनेक विधी, परंपरा, समारंभ, शॉपिंग, आणि अनेक आनंदाचे आणि उत्साहाचे क्षण असतात. यामध्येच एक पद्धत जी पूर्वापारपासून सुरु आहे ती म्हणजे उखाणे घेण्याची. लग्नात आई, बहीण, मावशी, मामी यांच्याकडून अनेक उखाण्यांचे सल्ले दिले जातात. मात्र, त्यातही काही जुनीच उखाणे असतात. तुम्हाला जर तुमच्या लग्नात काही हटके उखाणे घ्यायची असतील तर या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी उखाण्यांचा खजिना घेऊन आलो आहोत.
लग्न ठरलेली वधू माहेराहून सासरी जाताना उखाणे घेण्याची पद्धत अनेक परंपरांपैकी एक महत्त्वाची मानली आहे. या दरम्यान अनेक भावी वधू लग्नात उखाणा काय घ्यायचा या कल्पनेने गोंधळात असतात. अशाच भावी वधूंसाठी आम्ही काही सोपे उखाणे घेऊन आलो आहोत. जी तुम्ही लग्नात अगदी सहज घेऊ शकता.
लग्नातील काही उखाणे :
1. मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर-----ने दिला मला सौभाग्याचा आहेर
2. संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
----- रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला
3. सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
-----रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले
4. सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट--- रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट
5. प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले----रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले
6. कळी हसली, फूल फुलले, मोहरुन आला सुगंध----रावांमुळे जीवनात, बहरुन आलाय आनंद
7. प्रेमरुपी दिव्यात लावते प्रीतिची वात---रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात
8. आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे---राव हेच माझे अलंकार खरे
9. सनई आणि चौघडे, वाजे सप्त सुरात---रावांचे नाव घेते---च्या घरात
10. प्रेमळ शब्दामागे भावना असते कौतुकाची---रावांच्या साथीने सुरुवात करते सहजीवनाची
11. आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा,---रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा
12. जोडी आमची जमली, जमले 36 गुण; ---- रावांचं नाव घेते, ----ची सून
13. आईने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम----सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम
14. संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंददीप समाधानाचा---रावांचे नाव घेऊन, मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा
15. संसाररुपी पुस्तकाचे, उघडले पहिले पान---रावांचे नाव घेते सर्वांना राखून मान
16. जमले आहेत सगळे---च्या दारात----रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात
17. नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पदार्पण---रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण
महत्वाच्या बातम्या :
Isha Ambani Twins Baby : ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांच्या नावाचा अर्थ काय? जाणून घ्या