Isha Ambani Twins Name : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीने (Isha Ambani) जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. या जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ईशाच्या मुलांची नावेही ठेवण्यात आली आहेत. अंबानी कुटुंबातील या दोन नवीन सदस्यांची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय. तसेच, या मुलांची नावं काय आणि त्या नावांचा अर्थ काय याबाबतही चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय. तर, अंबानी आणि पिरामल कुटुंबाने कुटुंबातील नवीन सदस्यांची नावे कृष्णा आणि आदिया अशी ठेवली आहेत. ईशा अंबानीच्या मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया आहे. मात्र, या नावांचा अर्थ नेमका काय ते जाणून घ्या.

  


मुलाचं नाव कृष्णा आहे


जर आपण कृष्ण नावाबद्दल बोललो, तर ते हिंदू धर्मातील भगवान कृष्णाच्या नावावर आहे. कृष्णा हे अत्यंत पवित्र नाव आहे. भगवान कृष्णा यांना अनेक नावांनी संबोधले जाते. असे मानले जाते की, हे नाव प्रेमाची आठवण करून देते. तसेच. सत्याच्या लढ्यासाठी उभे राहण्याची आठवण करून देते. दक्षिण भारतात कृष्णा नावाची नदी देखील आहे. भारतातील अनेक कुटुंबात कृष्णा नाव ठेवले जाते.  


या नावाची मुले अनेक लोकांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना समाजात मिसळून लोकांवर स्वतःची छाप सोडायला आवडते. ते आपले जीवन साधेपणाने व्यतीत करतात, तसेच ते अनेक कलांमध्ये निपुण आहेत. असा या नावाचा अर्थ होतो. 


आदिया नावाचा अर्थ काय?


भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार, आदिया नावाचा अर्थ देवाने दिलेला खजिना आहे. असे मानले जाते की, आदिया नावाचे लोक खूप क्रिएटिव्ह असतात. या नावाच्या लोकांना कामाची आवड असते, मानसिक बळ हे देखील या लोकांचे वैशिष्ट्य असते. या लोकांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी अनेक संधी मिळतात आणि त्या संधींचा ते योग्य वापर करतात. कामात सातत्य आणि सिद्धी हेच त्यांच्या व्यवसायातील यशाचे कारण आहे.


ईशा अंबानीचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं


ईशा अंबानीने 4 वर्षांपूर्वी उद्योगपती आनंद पिरामलसोबत लग्न केले होते. ईशा रिलायन्स रिटेलचा व्यवसाय हाताळते, ती त्याची अध्यक्ष आहे. मुकेश अंबानी आता तीन लहान मुलांचे आजी-आजोबा झाले आहेत.  10 डिसेंबर 2020 रोजी आकाश अंबानी यांची पत्नी श्लोका मेहता यांनी पृथ्वी या मुलाला जन्म दिला.


महत्वाच्या बातम्या : 


Isha Ambani Welcome Twins: मुकेश अंबानी झाले आजोबा; ईशानं दिला जुळ्या मुलांना जन्म