नवी दिल्लीः रिलेशनशीपमध्ये राहणं प्रत्येकासाठी चांगला अनुभव असतो. पती-पत्नी असो किंवा तरुण-तरुणी असो. मात्र कोणतंही नातं तुटल्यानंतरचा काळ प्रत्येकासाठी कठीण असतो. रिलेशनशीप संपल्यानंतर अनेकांना आपलं जग संपलं, अशी परिस्थिती ओढावते.
ब्रेकअप झाल्यानंतर प्रत्येकाला दोन प्रकारचे अनुभव येतात. कोणी परिस्थितीचा बळी असतो, तर कोणी नव्या जिवनाची सुरुवात करतो, हे दोन अनुभव मिळतात, असं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे प्रत्येकाचं नातं संपल्यानंतर दोन मार्ग निवडण्याचा पर्याय समोर असतो.
अशी करा नवीन सुरुवात
ब्रेकअपनंतर भूतकाळ विसरुन पुढे जाण्याचा निर्णय घेतल्यास मनातून नकारात्मकता निघण्यास मदत होते. मनातून नकारात्मकता निघाल्यानंतर जे झालं ते चांगल्यसाठीच झालं, असा विचार मनात येतो. प्रत्येक ब्रेकअपनंतर काही तरी नवीन शिकण्यास मिळतं, असं मानसोपचार तज्ञांचं मत आहे. मात्र एखादा व्यक्ती जास्तच संवेदनशील असेल तर त्याने जपून पाऊल टाकणं गरजेचं आहे.
ब्रेकअपनंतर अनेकजण एकटेपणा पसंत करतात. एकटेपणा हा काही काळासाठी चांगला आहे. मित्रांमध्ये राहून राहून जेव्हा चिडचिड झाल्यासारखं वाटत असेल, तेव्हा एकटेपणाचा मार्ग स्विकारावा, असं मानसोपचार तज्ञ सांगतात. ब्रेकअपच्या काळात इतरांचा सल्ला हा अत्यंत गरजेचा असतो. या काळात विशेषतः मित्रांचा सल्ला फायदेशीर ठरतो, असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे ब्रेकअप झाल्यास खचून न जाता परिस्थितीतून तात्पर्य घेणं गरजेचं आहे.