Makar Sankranti 2023 : नवीन वर्ष 2023 ची सुरुवात झाली आहे. या नवीन वर्षात पहिलाच येणारा सण म्हणजे मकरसंक्रांती (Makar Sankranti 2023). 14 जानेवारीला येणारा मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. मात्र, आता काळ बदलत चालला आहे. आता महिला एकमेकांना गृहोपयोगी आणि टिकाऊ अशा वस्तू देतात. तर, यावेळच्या संक्रांतीनिमित्त तुम्हालाही महिलांना वाण द्यायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही खास ऑप्शन घेऊन आलो आहोत.
1. चांदीची भांडी
भांडी हा महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. घरात कितीही भांडी असली तरी मात्र इतरांनी दिलेली भांडी किंवा गिफ्ट म्हणून मिळालेली भांडी प्रत्येक महिलेला आकर्षित करतात. त्यामुळे या संक्रांतीनिमित्त तुम्ही तुमच्या मैत्रिणींना वाण म्हणून चांदीचं ताट, चांदीची वाटी, ग्लास किंवा बाऊलही वाण म्हणून देऊ शकता.
2. Vegetable Chopper
अनेकदा कामाच्या गडबडीत पटकन जेवणाचा डबा करून देताना भाज्या कापणं कंटाळवाणं किंवा वेळ खाणारं काम वाटतं. अशा वेळी महिलांचा ताण हलका होण्यासाठी तुम्ही वाण म्हणून व्हेजिटेबल चॉपर देऊ शकता. यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या बारीक करू शकता. जसे की, कांदा, कोबी, शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो इ.
3. कुंकवाचा करंडा
कुंकवाला सौभाग्याचं लेणं म्हणतात. मकरसंक्रांतीच्या दिवशी तुम्ही महिलांना कुंकवाचा करंडाही देऊ शकता. तसेच तिळगुळ देऊन मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता. बाजारात कुंकवाच्या करंड्याच्या वेगवेगळ्या डिझाईन पाहायला मिळतात. त्यापैकी तुम्ही युनिक डिझाईन वाण म्हणून देऊ शकता.
4. मेकअप किट
बदलत्या काळानुसार महिला देखील अनेक क्षेत्रात पुढाकार घेत आहेत. अशा वेळी घरगुती गृहिणींना तुम्ही मेकअप किट देखील वाण म्हणून देऊ शकता. बाईचं सौंदर्य जपण्यासाठी हे एक अप्रतिम ऑप्शन असू शकत. त्यामुळे तुम्ही वाण म्हणून मेकअप किटचा देखील विचार करू शकता.
5. हॅंडमेड पर्स
अनेकदा कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं. अशा वेळी तुमच्याकडे जर सुंदर नक्षीकाम केलेली हॅंंडमेड पर्स असेल तर ती कोणत्या महिलेला आवडणार नाही. मकरसंक्रांतीला वाण म्हणून तुम्ही पर्स हा पर्याय देखील निवडू शकता.
थोडक्यात, मकरसंक्रांतीला असं वाण द्या ज्याने तुमच्या महिला मैत्रिणींना फायदा होईल. रोज त्यांच्या वापरात येईल आणि आवडेल अशी एखादी वस्तू वाण म्हणून द्या.
महत्त्वाच्या बातम्या :