बाय बाय 2018... ! सरत्या वर्षातील महत्वाच्या राजकीय घडामोडी
दोन ऑक्टोबरचे हे दृश्य किसान क्रांती पदयात्रेचे आहे. शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये येण्यास मनाई केल्यानंतर संघर्ष उफाळून आला होता.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनाने देशभर शोकलाहार पसरली. त्यांच्या अंतिम यात्रेत पंतप्रधान मोदींसह अनेक नेते पायी चालत स्मृतिवनात पोहोचले.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधि यांच्या निधनानंतर देशभरात शोकलहर पसरली होती.
महाराष्ट्रात यावर्षी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. जे देशभरात चर्चिले गेले.
संसदेत पंतप्रधान मोदींना मिठी मारून आपल्या जागेवर बसल्यानंतर राहुल गांधींनी असा डोळा मारला. यावर देशभर एकच चर्चेचा माहोल रंगला होता.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अविश्वासाच्या प्रस्तावावर दिलेल्या भाषणानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या जागेवर जाऊन मिठी मारली.
जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी युती तुटली. यानंतर मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी 19 जून रोजी राजीनामा दिला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सत्येन्द्र कुमार जैन आणि गोपाल राय दिल्लीचे एलजी अनिल बैजल यांच्या घरी धरणे आंदोलनाला बसले होते.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना 7 जून रोजी आरएसएसच्या हेडक्वार्टरमध्ये बोलावणं आलं होतं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या शपथविधीला आलेले सर्व विरोधक. या राजकीय घटनेची मोठी चर्चा झाली होती.
डिब्रुगडमध्ये एयरबेसच्या भेटीदरम्यान संरक्षण मंत्री निर्मला सितारमण एयरफोर्सच्या ड्रेसमध्ये आल्या होत्या.
काँग्रेसच्या अधिवेशनात दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 17 मार्चला सोनिया गांधी यांचे भाषण झाल्यानंतर राहुल गांधींनी त्यांची गळाभेट घेतली.
अखिल भारतीय किसानसभेच्या वतीने मुंबईत आणलेल्या लॉन्ग मार्चचे हे दृश्य. शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चाचे चांगलाच चर्चेत राहिला.
विजय माल्या, नीरव मोदी आणि ललित मोदी यांच्या विरोधात जानेवारीत अनेक निदर्शने झाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 18 फेब्रुवारीला कोलकात्यात या तिघांच्या पुतळ्याचे दहन केले.
17 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भेट चर्चेत राहिली. या वेळी नेतान्याहू यांची पत्नी सारा नेतन्याहू चरख्यावरून उठताना पंतप्रधान मोदींनी त्यांना हात दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी 12 जानेवारीला पत्रकार परिषद घेतली. ही घटना देशातील ऐतिहासिक घटना होती. पत्रकार परिषद घेईन न्यायमूर्ती जस्ती चेलामेश्वर, रंजन गोगई (आताचे मुख्य सरन्यायाधीश), मदन बी लोकुर आणि जस्टिस कुरियन जोसेफ यांनी नाराजी व्यक्त केली होती.