Cinnamon Glowing Skin Face Pack : दालचिनी केवळ स्वयंपाकाची चवच वाढवत नाही तर तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. याचा वापर नियमित केला तर चेहऱ्याची चमक वाढते आणि त्वचा मऊ होते. थोडी दालचिनी पावडरमध्ये थोडासा लिंबूचा रस मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. या फेसपॅकमुळे तुमची त्वचा सुंदर दिसेल. तुम्हाला चमकणारा आणि सुंदर चेहरा हवा असेल तर तुम्ही दालचिनी वापरू शकता. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दालचिनीचा उपयोग केल्यास आपल्या त्वचेचं आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. कारण यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत.


दालचिनीचा वापर कसा करावा


दालचिनी आणि मध


दालचिनी आणि मध एकत्र करा. त्याची पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा. 15-20 मिनीटानंतर हा फेसपॅक स्वच्छ धूवुन टाका. या फेसपॅकमुळे तुमचा चेहऱ्यावर ग्लो येईल. 


दालचिनी आणि दही


दालचिनी  पावडरमध्ये थोडे दही मिसळा आणि स्क्रब तयार करा. तो स्क्रब चेहऱ्याला लावून मसाज करा आणि मग धुवून टाका. तुमची त्वचा या स्क्रबने चमकदार बनेल.


दालचिनी आणि खोबरेल तेल


दालचिनी पावडर थोडे तेलात मिसळून चेहऱ्यावर लावा. चांगले मसाज करा आणि नंतर धुवा. त्यामुळे त्वचा सुंदर, चमकदार आणि मऊ बनेल.


जाणून घ्या त्वचेसाठी दालचिनी किती फायदेशीर आहे 


घाण आणि धूळ काढून टाकण्यासाठी फायदेशीर


दालचिनीमध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात. जे तुमच्या चेहऱ्यावरील धूळ, घाण काढून टाकण्यासाठी फायदेशीर असतात.


ग्लोईंग त्वचेकरता चांगले


दालचिनीमध्ये त्वचेला मऊ (Soft), चमक वाढवण्याचे गुणधर्म असतात. 


अँटीएजिंग गुणधर्म


दालचिनीमध्ये अँटीएजिंग गुणधर्म आहेत जे वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास मदत करतात आणि त्वचा मऊ करू शकतात. 


अँटिऑक्सिडेंट गुणधर्म


दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे त्वचेवरील डाग कमी होण्यास मदत होते.


त्वचेच्या आजारांसाठी फायदेशीर


 दालचिनीमध्ये असे गुणधर्म आहेत जे त्वचा निरोगी आणि सुंदर बनविण्यास मदत करतात. एक्झिमा सारख्या त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यासाठी दालचिनी उपयुक्त ठरते.


मुरुम दूर करते


दालचिनीचा वापर मुरुम कमी करण्यास मदत करू शकतो, कारण त्यात बॅक्टेरियाचा नाश करणारे अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Health Tips : एका दिवसात किती काजू खाणे आरोग्यासाठी चांगले आहे? घ्या जाणून