Kitchen Tips : वाढत्या वयाबरोबर आणि अनेक कारणांमुळे वेळेपूर्वीच केस पांढरे (White Hair) होऊ लागतात. पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल डाई लावली जाते, पण हा डाई केमिकलयुक्त असल्याने केसांसाठी हानीकाकर ठरू शकतो. त्याचबरोबर मेहंदीचा वापर केसांसाठी चांगला असतो, पण मेहंदी नीट लावली नाही तर केस काळे होण्याऐवजी लाल होतात. अशात पांढरे केस काळे करण्यासाठी हळदीचा वापर केला जाऊ शकतो. हळद केवळ त्वचेचे सौंदर्यच वाढवत नाही तर केसांचे सौंदर्य देखील वाढवते. पांढऱ्या केसांवर हळद लावण्याची योग्य पद्धत येथे जाणून घ्या.
पांढरे केस काळे करण्यासाठी हळद
हळद आणि नारळ
पांढरे केस काळे करण्यासाठी हळद आणि नारळ एकत्र करून डोक्यावर हेअर मास्क म्हणून लावू शकता. हा हेअर मास्क बनवण्यासाठी कच्च्या हळदीचे २ तुकडे घ्या आणि बारीक करा. आता एका भांड्यात खोबरेल तेल घेऊन ते गॅसवर ठेवा आणि हे तेल गरम करा आणि त्यात हळद घाला. हे थोडेसे कोमट मिश्रण केसांना १५ ते २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर केस धुवा. आठवड्यातून एकदा केसांना अशी हळद लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात.
हळदीचा स्प्रे
केसांवर हळदीचा स्प्रे देखील लावता येतो. एक चमचा हळद आणि थोडे कोरफड जेल एक कप पाण्यात मिसळा. आता बाटली नीट हलवा आणि हे पाणी केसांच्या मुळापासून टोकापर्यंत स्प्रे करा. हा स्प्रे केसांवर किमान तासभर लावल्यानंतर केस धुवून स्वच्छ करा. हे केस काळे होण्यास मदत करते आणि केस चमकदार बनवते.
अंडी आणि हळद मास्क
पांढऱ्या केसांवर अंड्याचा आणि हळदीचा मास्क लावता येतो. हा हेअर मास्क बनवण्यासाठी २ अंडी, २ चमचे मध आणि २ चमचे हळद मिक्स करा. हा हेअर मास्क टाळूपासून केसांच्या टोकापर्यंत लावा आणि नंतर धुवा. हा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांना लावल्याने पांढरे केस काळे होऊ लागतात.
हळद शैम्पू
पांढरे केस काळे करण्यासाठी तुम्ही हळदीचा शैम्पू बनवून लावू शकता. हा शैम्पू बनवण्यासाठी 2 चमचे हळद एक चमचा मध आणि थोडे दूध मिसळा. केस धुण्यासाठी ही पेस्ट वापरा. हे हेअर मास्क म्हणूनही डोक्यावर लावता येते. 20 ते 25 मिनिटे केसांवर ठेवल्यानंतर ते धुता येते. हे टाळूवरील कोंडा दूर करण्यासाठी आणि पांढरे केस काळे करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health News : हो.. 'तो' पदार्थ तुमच्याच किचनमध्ये, तुमच्याच समोर आहे! पोटापासून हृदयापर्यंतच्या आजारांना दूर ठेवतो