Relationship Tips : सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन डे चं वातावरण आहे. सगळे आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्याचा, प्रेम देण्याचा प्रयत्न करतायत. पण या सगळ्यात डेटिंग रिलेशनशिपशी संबंधित एक शब्द आजकाल खूप चर्चेत आला आहे आणि तो म्हणजे घोस्टिंग (Ghosting). हा कोणताही भूताचा प्रकार नाही. पण Ghosting म्हणजे एखादी व्यक्ती जोडीदाराला न सांगता, कोणतेही संबंध न ठेवता अचानक नात्यातून बाहेर पडते. अशा परिस्थितीत समोरच्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. नक्की काय झालं असेल? का बोलणं बंद केलं असेल? काही चुकलं का? अचानक वचनं देऊन कोणीतरी बोलणे थांबवते याच परिस्थितीला मानसशास्त्राच्या भाषेत Ghosting म्हणतात.


ब्रेकअपपेक्षा Ghosting किती धोकादायक आहे?


ब्रेकअपमध्ये समोरची व्यक्ती तुम्हाला सांगून तुमच्याशी नातं तोडते. पण Ghosting मध्ये व्यक्ती एक दिवसाआधी चांगली बोलते आणि नंतर आपल्या जोडीदाराला त्याच्या आयुष्यातून पूर्णपणे काढून टाकते. पूर्णपणे तोडून टाकते. त्यावेळी समोरच्या व्यक्तीला या संदर्भा कोणताही इशारा किंवा कोणतीही सूचना दिली जात नाही. याचाच अर्थ Ghosting मध्ये समोरची व्यक्ती फारसा तुमचा विचार करत नाही. आणि ज्या व्यक्तीला इग्नोर केलं जातं तिच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. Ghosting हा शब्द 1990 मध्ये वापरला गेला होता. पण, ऑनलाईन डेटिंगच्या काळात तो अधिक लोकप्रिय झाला.


Ghosting कसं ओळखावं? 



  • अचानक तुमच्या मेसेजेसना रिप्लाय देणं बंद करणे

  • तुमचा कॉल रिसीव्ह न करणे

  • ना मेसेजिंग, ना मेसेजला रिप्लाय.

  • कॉल पाहिल्यानंतरही न उचलणे किंवा ब्लॉक


Soft Ghosting म्हणजे काय?


Soft Ghosting म्हणजे सर्वकाही अचानक संपत नाही. हळूहळू संपर्क कमी होतो, मग भेटणे थांबते. मग कॉल थांबतो आणि शेवटी मेसेज येणं देखील बंद होतं. अशा प्रकारे व्यक्तीपासून हळूहळू अंतर दूर केलं जातं.


तुमच्या बरोबरही जर तुमचा पार्टनर असा व्यवहार करत असेल तर, एकदा पार्टनरशी नीट बोलण्याचा प्रयत्न करा. प्रश्न सुटत असतील तर ठिक आहे. अन्यथा तुम्ही देखील Ghosting च्या जाळ्यात फसला आहेत हे समजा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल