IRON : आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या व्हिटॅमिन, मिनरल्सची गरज असते. सध्याच्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात तर या गोष्टीवर जास्त भर दिला जात आहे. शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राखण्यासाठी व्हिटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता नसली पाहिजे. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आयर्न हे मिनरल हे गरजेचं आहे. जर आपल्या शरीरात आयर्नची कमतरता निर्माण झाली तर लाल पेशी (आरबीसी) कमी व्हायला लागतात. आयर्नमध्ये हिमोग्लोबीन असल्यामुळे आपल्या शरीरातील लाल पेशी वाढण्यास मदत होते आणि त्या जर कमी झाल्या तर त्याचा शरीरावर परिणाम होतो. आयर्नचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन आपल्याला अनेक आजार होऊ शकतात.
जाणून घेऊया शरीरातील आयर्नचे कमतरतेची लक्षणे आणि उपाय...
आयर्नची कमतरता असल्यास लाल रक्तपेशी कमी होतात
थकवा, डोकेदुखी, चक्कर येऊ शकते.
आयर्नच्या कमतरतेमुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात.
आयर्नच्या कमतरतेमुळे चिडचिडेपणा आणि त्वचा रंगहीन होण्याची भीती
आयर्नच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि नखं पांढरी होऊ लागतात.
आयर्नची कमतरता कशी दूर करावी-
जर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा समावेश करावा. यासाठी तुम्ही काळे तीळ, खजूर, गहू , मनुके, बीट, गाजर आणि अंडी खाऊ शकता. त्यामध्ये बरीच आयर्न मिनरल असतात. मांसाहारी लोकांसाठी मटण, मासे यामधूनही आयर्नची कमतरता पूर्ण करू होते. तसेच हिरव्या भाज्या आणि फळांमध्येही आयर्न असते. आपल्या शरीरात आयर्न चांगले राखण्यासाठी, व्हिटॅमिन-सी असलेले अन्न देखील खाणं गरजेचं आहे.
महिलांना आयर्नची कमतरता असल्यास काय होऊ शकते?
मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान बहुतेक लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता भासू शकते. आयर्नच्या या कमतरतेमुळे इतर बर्याच समस्या देखील उद्भवू शकतात. त्याचबरोबर अशक्तपणा आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ शकते. ज्यामुळे स्नायूंयपर्यंत ऑक्सिजनचा योग्य प्रमाणात पुरवठा होत नाही.