दातांपासून केसांपर्यंत मीठाचे अनेक फायदे
अंघोळीदरम्यान थोडेसे मीठ डोक्यावर टाकून केस धुतल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होतो.
एक चमचा मीठ हे उत्तमप्रतिचे दंतमंजन आहे. एक चमचा मीठ आणि बेकिंग पावडर यांच्या मिश्रणाने रोज दात घासल्यास, दातांचा पिवळसरपणा जाऊन पांढरेशुभ्र होतात.
आपल्या दैनंदिन आहारात एक चमचा मीठाचा आपल्या आहारात वापर होतो. पण हेच मीठ तुमच्या सौंदर्यासाठीही तितकेच उपयोगी आहे.
466274तुमच्या नखांची चमक वाढवण्यासाठीही याचा उपयोग होतो. एक चमचा मीठ, एक चमचा बेकिंग पावडर आणि एक चमचा लिंबू पाणी हे मिश्रण गरम पाण्यात मिसळा. आपली बोटे काही काळासाठी या भांड्यात धरा. तुमच्या नखांची चमक वाढेल.813
अर्धा चमचा मीठ आणि बेकिंग पावडर एक कप पाण्यात घालून त्याच्या गुळण्या केल्यास तोंडातील दुर्गंधी नष्ट होते.
अर्धा कप मीठ, एक चतुर्थांश कोरफड रस किंवा जेलमध्ये एकत्रित करा. त्यात तुमच्या आवडीच्या इसेन्शिअल ऑईलचे दोन-चार थेंब टाका. या मिश्रणाने बॉडी मसाज केल्यास शरीराला आराम मिळतो.
मोहरी तेल आणि थोडसे मीठ मिश्रण एकत्रित करुन त्याने हाताची मालिश केल्यास त्वचा कोमल बनते. तसेच या मिश्रणाने चेहरा धुतल्यास चेहरा उजळ बनतो.