✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

घर घेण्यापूर्वी या गोष्टी जरुर लक्षात ठेवा !

एबीपी माझा वेब टीम   |  08 Jun 2016 10:07 AM (IST)
1

जर तुम्ही टप्प्या टप्प्याने कर्ज घेतले असेल, तर सुरूवातीचा EMI कमी असतो, पण जसजसं तुमचे उत्पन्न वाढेल तसतसा तुमच्या कर्जाच्या हप्त्यांमध्ये वाढ होते. आजकाल अनेक बँका स्टाँप ड्युटी, ट्रान्सफर, पार्किंग चार्जेस, क्लब हाऊस मेंबरशिप, इंटेरिअर आदींसाठी पैसे देतात. पण तुम्हाला याची सुरुवातीला चौकशी करण्याची गरज आहे.

2

गृहखरेदीसाठी EMI वरदेखील लक्ष द्या. जर तुम्ही अविवाहीत असाल, तर तुमचा EMI 60 ते 65 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, आणि जर विवाहीत असाल, तर EMI 35 ते 40 टक्क्यांदरम्यानच असला पाहिजे. जास्त कर्जासाठी तुमच्या घराची किंमत जास्त असणे गरजेचे आहे. सामान्यत: कोणतीही हाऊसिंग फायनान्स कंपनी तुमच्या मासिक पगाराच्या 30 ते 55 टक्के कर्जाची रक्कम रिपेमेंट करण्याचा तगादा लावते. दुसरा पर्याय म्हणजे दीर्घकाळात कर्ज चुकते केल्यास तुमचा EMI कमी होऊ शकतो.

3

प्रत्येक व्यक्तीचं आपलं स्वत:चं घर असावं, असं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी तो दिवसरात्र झटत असतो. नोकरदारवर्ग तर यासाठी बँकांकडून मोठमोठ्या व्याजदराने कर्जही घेतो. त्याचा हा निर्णय त्याच्या आयुष्याला मोठी कलाटणी देणारा असतो. कारण, गृहकर्जाचे हप्ते फेडण्यात त्याचा महिन्याचा पगार खर्च होतो. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे याबाबतच्या काही टिप्स-.

4

घर खरेदीच्या व्यवहारादरम्यान नगरपालिका किंवा महानगरपालिकेत जाऊन नवीन वीज आणि पाण्याचे कनेक्शनसाठी अर्ज करा. जर तुम्हाला तुमच्या जुन्या घर मालकाने तुमच्या नावावर घर करताना वीज आणि पाणी कनेक्शन तुमच्या नावावर केले नसेल, ते तात्काळ तुमच्या नावावर करून घेण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावा. तसेच तुमचे टेलिफोन कनेक्शनदेखील तुम्ही शिफ्ट होण्याआधीच बदललेल्या पत्त्यावर ट्रान्सफर करून घ्या.

5

घराचा ताबा मिळाल्यानंतर जेव्हा तुम्ही तिथे शिफ्ट व्हाल, त्यावेळी तुमची बँक, क्रेडीट कार्ड कंपनी, विमा कंपनी, तसेच संपर्कातील सर्वांना तुमचा बदललेला पत्ता नक्की कळवा.

6

तुम्ही गृहकर्ज घेणे कोव्हाही उत्तम. कारण यामुळे तुमच्या घराच्या कागदपत्रांची पडताळणीची स्रर्व कायदेशीर प्रक्रिया यानिमित्त पार पडेल. यात तुम्ही बिल्डरच्या जाळ्यात अडकू शकणार नाही. गृहकर्ज घेताना कोणत्या बँकेचे व्याजदर सर्वात कमी आहेत, हे जरूर पाहा.

7

घर खरेदी करण्यापूर्वी तुमचं महिन्याचं घर खर्चाचं बजेट किती आहे, याचीही पडताळणी करून घ्या. कारण गृहकर्जाचे हप्ते भरताना याचा थेट परिणाम तुमच्या महिन्याच्या आर्थिक गणितांवर होईल. एकदा कर्ज घेतल्यानंतर कोणत्याही घरगुती उपकरणांसाठी खर्च करण्यावर बंधने येतात.

8

सध्या सर्वांचीच जीवन पद्धती गतिमान झाल्याने जिथे तुम्ही काम करता त्याच ठिकाणी राहण्याचा अनेकांचा कल असतो. पण तुम्ही घर खरेदी करताना कोणत्या शहराला प्रॉयोरिटी देता यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे घर खरेदी करताना तुम्हाला तुमच्या शहराचे लोकेशन सुटेबल आहे का याची पडताळणी करा. कारण याचा परिणाम सर्वात पहिल्यांदा तुमच्या बजेटवर होणार आहे. एखाद्या कमी विकसित जागी घर खरेदी करण्यापेक्षा चांगल्या भागात खरेदी करणे केव्हाही चांगले.

9

एकदा का घर खरेदी करण्याचा निर्णय झाला की, त्यसाठी तुमच्याकडे किती बँक बॅलेन्स आहे हे देखील पाहा. यानंतर तुम्ही जेव्हा रिअल इस्टेट एजंटशी संपर्क साधाल, त्यावेळी तुम्ही तुमच्या प्रॉयोरिटीज त्याला सांगा. शिवाय बिझनेस न्यूज पेपरमध्ये प्रकाशित झालेल्या जाहिरातींच्या माध्यमातून देखील तुम्ही स्वत: शोध घेऊ शकता. जेव्हा तुम्ही घर पाहायला जाल, तेव्हा त्या घराचं लोकेशन योग्य आहे का हे पाहून ते खरेदी करा.

10

सर्वात आधी घर खरेदी करताना तुम्ही तुमचं महिन्याचं बजेट किती आहे, याचा गांभीर्याने विचार करा. शिवाय घर खरेदी केल्यानंतर तुम्ही तेथे कधीपर्यंत राहण्यास जाऊ शकता, हे देखील पडताळून पाहा. कारण अनेकदा तरुण घर खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतात, आणि नंतर त्यांचे हप्ते फेडण्यासाठी ते भाड्याने देण्याचा विचार करतात. तेव्हा त्याला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याकाळात त्याच्याकडे गुंतवणुकीचे इतर पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे घर खरेदी करताना तेथे कधीपर्यंत राहायला जाऊ शकाल, हा काळ आणि तुम्ही किती किमतीपर्यंतचे घर खरेदी करू शकता, याचा विचार करा. कारण त्यानुसार तुम्हाला बँकेचे हप्ते भरावे लागणार आहेत. सर्वसाधारणपणे तुमची बँक तुम्हाला घराच्या किमतीच्या ८० टक्के रकमेचे कर्ज देते. त्याच्यावरील २० टक्के रक्कम तुम्हाला उभी करावी लागते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटच्या बाहेर जाऊन घर खरेदी करण्याचा निर्णय घेऊ नका.

11

प्रातिनिधिक फोटो

  • मुख्यपृष्ठ
  • Photos
  • बातम्या
  • घर घेण्यापूर्वी या गोष्टी जरुर लक्षात ठेवा !
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.