मुंबई : शरीरात रक्त कमी असण्याचं मुख्य कारण म्हणजे रक्तात लोहाचं प्रमाण कमी होणं. पौष्टिक आहार नसेल तर रक्तातील लोह कमी होऊ शकतं. शरीरातील रक्त कमी झालं, की अनेक आजार डोकं वर काढतात. त्यामुळे शरीरातील रक्त वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय


• शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर बीटरुट सर्वात चांगला पर्याय आहे. कारण बीटामध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, फायबर आणि पोटॅशियम हे सर्व योग्य प्रमाणात असते.

• दोन चमचे तीळ दोन तास पाण्यात भिजत ठेवा. पाणी गाळून त्याच्या पेस्टमध्ये एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण दिवसातून 2 वेळा खा.

• डाळिंबामुळे रक्तातील हिमोग्लोबिन भरपूर वाढते. डाळिंबामध्ये लोह आणि कॅल्शियमसोबत प्रथिनं, कर्बोदकं आणि फायबर असतात. यामुळे शरीरात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढायला मदत होते.

• साधारण तीन ते पाच अंजीर दुधामध्ये उकळवून खा किंवा अंजीर खाऊन त्यावर दूध प्या. शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

• संध्याकाळी दोन चिमूट हळद टाकून कोमट पाणी प्यायल्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते.

• जांभळाचा रस आणि आवळ्याचा रस समप्रमाणात घेऊन ते प्यायल्यास हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.

• क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळेही शरीरातील रक्त कमी होऊ शकते. यासाठी क जीवनसत्त्व असलेले खाद्यपदार्थ खा. आवळ्यामध्ये क जीवनसत्त्व भरपूर असते. आवळा चटणी आणि मुरंबा अशा कुठल्याही रुपात खा.

• अश्वगंधाचे 1 ते 2 ग्रॅम चूर्ण आवळ्याच्या 10 ते 40 मिलिग्राम रसासोबत घेतल्यास हिमोग्लोबिन वाढते.

• एक ग्लास पाण्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून त्यात 20 ते 25 सुकामेवा रात्री भिजत ठेवा. सकाळी गाळून ते पाणी प्या आणि सुकामेवा चावून खा. शरीरात रक्ताचे प्रमाण भरपूर वाढेल.