Home Tips : निरोगी राहण्यासाठी स्वच्छतेची (Clinliness) काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे सर्वात महत्त्वाचे आहे. काही लोक दर आठवड्याला त्यांची चादर (Bedsheet) आणि टॉवेल धुतात, तर काही लोक महिन्यानंतर धुतात. चादरी आणि टॉवेल धुण्याबद्दल लोकांची स्वतःची अशी मतं आहेत. पण, चादर आणि टॉवेल नेमके किती दिवसांनी धुवावेत याचं अचूक उत्तर मात्र कोणालाच माहीत नाही.
खरंतर, जेव्हा आपण अंघोळीनंतर टॉवेल वापरतो तेव्हा शरीरात असलेले सूक्ष्म जंतू त्यात प्रवेश करतात. हे सूक्ष्म जंतू आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. तसेच, काही लोकांन अंघोळीनंतर टॉवेल तसाच ओला बेडवर किंवा कुठेही ठेवण्याची सवय असते. ओला टॉवेल ठेवल्यामुळे त्या ठिकाणी जंतूंची पैदास होते. त्याचप्रमाणे ज्या पलंगावर तुम्ही रोज झोपता त्यावर मोठ्या प्रमाणात मृत पेशी, घाम, तेल आणि जंतू जमा होतात. टॉवेलचे फॅब्रिक बेडशीटपेक्षा जाड असते, त्यामुळे ते जास्त काळ ओले राहतात.
चादर कधी धुवावी?
बेडशीट किंवा चादर कधी धुवायची असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ते आपण कसं आणि किती वापरतो यावर अवलंबून आहे. जर तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केली किंवा हिवाळ्यात तुम्ही स्वेटर घालून झोपलात तर तुमची चादर लवकर घाण होणार नाही. तर, जर तुम्ही दिवसभर धुळीत काम केले असेल, बाहेर राहिला असाल आणि अंघोळ न करता झोपत असाल तर मात्र चादर तुम्हाला दर तीन ते चार दिवसांनी धुवावी लागेल. जर तुम्ही स्वच्छता राखत असाल तर तुम्ही बेडशीट आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा धुवा. बेडशीट कधी धुवायची हे पूर्णपणे त्याच्या वापरावर अवलंबून असते.
टॉवेल कधी धुवायचे?
बेडशीटपेक्षा टॉवेल जास्त वापरला जातो, ज्यामुळे तुम्हाला तो जास्त वेळा धुवावे लागतो. टॉवेल बराच काळ ओला राहतो. तो पटकन सुकत नाही. त्यामुळे त्यामध्ये जंतू वाढू लागतात, त्यामुळे त्यांना लवकर स्वच्छ करणं गरजेचं आहे. अनेक वेळा असे घडते की टॉवेल वारंवार धुतल्यानंतरही त्यांना वास येत राहतो, असं का होतं? असा प्रश्न जर तुम्हला पडला असेल तर टॉवेल धुतल्यानंतरही दुर्गंधी येण्याची अनेक कारणे असू शकतात. काही लोक कपडे धुतल्यानंतर बराच वेळ मशिनमध्ये ठेवतात, त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येते. कधी कधी टॉवेलचे कापड व्यवस्थित सुकले नाही तरी त्यातून दुर्गंधी येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.