Holi 2022 : भारतातील सणांना रंगांचं एक वेगळं आकर्षण आणि महत्व आहे. होळी (Holi 2022) हा सण देशभरात साजरा केला जातो. होळी सण म्हटला की अनेक रंग डोळ्यांसमोर येतात. पण त्यातूनही पांढऱ्या रंगाला विशेष पसंती दिली जाते. होळीच्या दिवशी पांढऱ्या रंगांचेच कपडे का परिधान करतात? पांढरा रंग का खास मानला जातो? पांढरे कपडे घालण्याची नेमकी कारणे कोणती ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.   


होळीच्या दिवशी पांढरे कपडे घालण्याचे महत्त्व काय? 


होळीचा सण सुद्धा इतर सणांप्रमाणेच आनंद घेऊन येत असला तरी, या सणाला लोक आपापसांतील मतभेद विसरून एकमेकांना शुभेच्छा देतात. रंगांची उधळण करतात. आनंद साजरा करतात.  



  • यावेळी होळीच्या दिवशी खास योग बनवला जात आहे. हा बुध-गुरुदित्य योग मानला जातो. हा योग अनेक वर्षांनी तयार होतो. ज्योतिषाचार्य पंडित अमर यांच्या मते होळीच्या सणाला पांढरे कपडे परिधान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

  • पांढरे कपडे हे शांततेचे प्रतीक आहेत आणि पांढऱ्या रंगात प्रत्येक रंग खुलून दिसतो. त्यामुळे होळीच्या सणाला पांढरे कपडे खास परिधान केले जातात.

  • मनातील शांती आणि सुख-समृद्धीचे प्रतीक असलेल्या पांढऱ्या कपड्यांमधून लोक शांतीचा संदेश देतात, असे त्यांनी सांगितले.

  • तसेच, मनातील सगळी जळमटं दूर करून खुल्या मनाने लोकांचा स्विकार करणे हा गुण देखील पांढऱ्या रंगात आहे. 

  • होळीच्या निमित्ताने शत्रूही मिठी मारतात आणि त्यांचे दुःख दूर करतात, असा समज आहे. ज्याप्रमाणे पाण्याला रंग नसतो आणि पाण्यात मिसळलेला रंग स्वतःचा बनतो. तसेच पांढऱ्या कपड्याला स्वतःचा रंग नसतो. पांढऱ्या कपड्यावर कोणताही रंग परिधान केला तरी तो त्या रंगाचा बनतो.

  • सर्वात महत्वाचं म्हणजे होळी हा सण उन्हाळ्यात साजरा केला जाणारा आहे. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठीदेखील पांढऱ्या रंगाला विशेष महत्व आहे. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha