International Girl Child Day : रिलायन्स फाउंडेशनच्या  (Reliance Foundation)  पुढाकारानं, 'हर सर्कल (Her Circle)'नं आंतरराष्ट्रीय कन्या दिन (International Day of the Girl-11 ऑक्टोबर) एका अशा महिलेसोबत साजरा केला, जिला जन्मानंतरच जमिनीत जीवंत गाडण्यात आलं होतं. कारण तिनं एक मुलगी म्हणून जन्म घेतला होता. दरम्यान, तिनं संघर्ष केला, प्रथा, परंपरा आणि रुढींना आव्हान देत, आपल्या समाजातील स्त्रीभ्रूण हत्येची प्रथा संपवली.


51 वर्षीय कालबेलिया नृत्यांगना गुलाबो सपेराला जन्मानंतर लगेचच तिच्या समाजातील महिलांनी जीवंत गाडलं होतं. पाच तासांनी त्यांनी आई आणि काकीनं वाचवलं होतं. आज ती जागतिक दर्जाची प्रसिद्ध लोक कलाकार, शिक्षिका आणि महिला अधिकार कार्यकर्ता आहे. गुलाबो सपेराला 2016 मध्ये चौथा सर्वोच्च नागरिका सन्मान, पद्म श्री सहित इतरही अनेक सन्मान मिळाले होते. 


गुलाबो सपेरा यांनी एका व्हिडीओ इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हटलं की, मी तयार केलेल्या शिल्पासाठी पद्म श्री जिंकल्यानंतर मला माझ्या समाजातून स्त्री भ्रूण हत्येची कूप्रथा संपवण्यासाठी बळ मिळालं. माझ्या समुदायातील मुली आज शिक्षण घेत आहेत आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहे. जगभरात कालबेलिया नृत्य प्रकाराला ओळख मिळाली. आता आम्ही पारंपारिक रुढी, प्रथांमध्ये अडकलो नाही. 


गुलाबो सपेरा म्हणाल्या की, "महिला कोणत्याच बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही. एका महिलेला त्या पुरुषापेक्षा कमी का समजलं गेलं नाही पाहिजे, ज्याला तिनं जन्म दिला आहे? लोकांनी मला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, मी पुढे चालत राहिले. सर्व मुलींना मी एवढंच सांगीन की, पुढे जात राहा. आम्हाला कोणीच थांबवू शकत नाही."


आंतरराष्ट्रीय बालिका दिन जगभरात भविष्यातील वाटचालीसाठी स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. भारतातील अनेक भागांत अजूनही स्त्री भ्रूण हत्या आणि वाल विवाह यांसारख्या प्रथा सुरु आहेत. Her Circle या कूप्रथांचा निषेध करतं आणि बालिकांसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं पावलं टाकत आहे. 


या पार्श्वभूमीवर बोलताना रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन आणि Her Circle च्या संस्थापक, नीता मुकेश अंबानी म्हणाल्या की, "मला महिलांना पुढे जाताना पाऊन आणि यशस्वी होताना पाहून आनंद होतो. आंतरराष्ट्री कन्या दिनाच्या निमित्तानं माझी इच्छा आहे की, सर्व मुलींनी सशक्त होणं गरजेचं आहे."


नीता अंबानी पुढे बोलताना म्हणाल्या की, "मला आनंद आहे की, सहा महिन्यांच्या अगदी लहान काळात Her Circle ने बंधुभाव आणि एकात्मतेचं समान आणि सर्वसमावेशक डिजिटल आंदोलन तयार केलं आहे. Her Circle महिलांसाठी कनेक्ट होण्याचं आणि त्यांच्या गोष्टी सांगण्यासाठी, तसेच ऐकण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. महिला आणि मुलं, खासकरुन लहान मुली, रिलायन्स फाउंडेशनमध्ये आमच्या सर्व कामांच्या केंद्रस्थानी असतात. आमचे उपक्रम संपूर्ण भारतात राबवण्यात येतात. त्यांची स्वप्न पूर्ण करतो."