Immunity Booster : जसजसा हिवाळा (Winter Season) ऋतू सुरु होतो तसतसे अनेक रोग आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. तसेच, देशात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. खरंतर, या ऋतूमध्ये अनेक लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते, ज्यामुळे ते कोणत्याही आजार आणि संसर्गास सहज बळी पडतात. गेल्या काही दिवसांपासून संसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढलं आहे. अशा वेळी, या वाढत्या आजारात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असणं आवश्यक आहे.
तुम्हाला हिवाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवायचं असेल तर स्वत:ला आणि तुमच्या जवळच्या लोकांना सुरक्षित ठेवायचे असेल तर तुमच्या आहारात काही औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करणं आवश्यक आहे.
दालचिनी (Cinnamon)
दालचिनी हा भारतीय जेवणात वापरला जाणारा सर्वात लोकप्रिय मसाला आहे. दालचिनी त्याच्या सुगंध आणि चवीसह अन्नाची चव वाढवते. मात्र, जेवणाची चव वाढवण्याबरोबरच दालचिनी तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचे रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण होते.
हळद (Turmeric)
हळदीचा वापर नेहमीच त्याच्या चमत्कारिक गुणधर्मांसाठी केला जातो. जेवणाची चव वाढवण्याबरोबरच हळद आरोग्यालाही अनेक फायदे देते. हळद तुमच्या शरीराची न्यूरोप्रोटेक्शन क्षमता वाढवते, जी विषाणूजन्य आजारांविरुद्ध लढण्यास मदत करते.
शिलाजीत (Shilajit)
आयुर्वेदात वापरलेले शिलाजीत हा एक आवश्यक खनिज आहे, जे शरीराला ऊर्जा देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. इतकेच नाही तर, ते पुनरुत्पादक अवयवांना शक्ती देते. शिलाजीत हे मूत्र प्रणाली आणि मूत्रपिंडांसाठी चांगले असते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि प्रजननक्षमतेस प्रोत्साहन मिळते. या औषधी वनस्पतीमुळे रक्ताभिसरण वाढते आणि हिवाळ्यात सांधेदुखी कमी होते.
तुळस (Tulsi)
तुळस ही एक वनस्पती आहे जी जवळपास प्रत्येक घरात आढळते. अध्यात्मिक महत्त्व असण्याबरोबरच तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात अनेक अँटिऑक्सिडंट असतात, जे व्हायरस, ऍलर्जी आणि संक्रमणांशी लढतात. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी तुळशीचा वापर करा.
आलं (Ginger)
लोकांना अनेकदा थंडीच्या वातावरणात आल्याचा चहा प्यायला आवडतो. लोकांना आलं फक्त चवीमुळेच नाही तर त्याच्या फायद्यांमुळेही प्यायला आवडते. खरंतर, या ऋतूमध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी आलं हा एक उत्तम पर्याय आहे. आल्यामध्ये आढळणारे जिंजरॉल घसादुखीच्या समस्येवर उत्तम उपाय आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.