Improve Immune System : पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. पाऊस म्हटला की विविध प्रकारचे रोग, जंतू आणि जीवाणूंचा सतत आपल्यावर परिणाम होत असतो. अशा वेळी या आजारांचा सामना करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती (Immune System) मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात बदल करून काही नवीन आहार पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं आहे. आपल्या आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

  


पाणी


खरंतर कोणत्याही आजाराचा सामना करण्यासाठी पाण्यासारखं उत्तम औषध नाही. पाण्याला आप जीवनदान मानो. मुबलक प्रमाणात शुद्ध पाण्याचे सेवन केल्याने शरीरात साचलेले अनेक प्रकारचे विषारी घटक बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. पाणी एकतर सामान्य तापमानात किंवा थोडे कोमट असावे. या वातावरणात फ्रीजचे पाणी पिणे टाळा.
 
रसाळ फळांचं सेवन करा 


संत्री, मोसमी इत्यादी रसाळ फळांमध्ये खनिज क्षार आणि क जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. तुम्हाला हवे असल्यास रसाळ फळे खा. या फळांमध्ये वरून मीठ घालू नका. 


ड्रायफ्रूट्स 


ड्रायफ्रूट्स सुद्धा शरीरासाठी फार फायदेशीर असतात. ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन के असतं. पौष्टिक असल्यामुळे याचं सेवन केल्याने पोट अधिक काळ भरलेले राहते. तसेच, ते रात्रभर भिजवून सकाळी जेवणाच्या अर्धा तास आधी चहा किंवा दुधासोबत घेतल्याने खूप फायदा होतो.


मोड आलेले कडधान्य खा


मोड आलेले कडधान्य जसे की, मूग, मटकी, हरभरा यांसारख्या कडधान्यांचं भरपूर प्रमाणात सेवन करा. यामध्ये व्हिटॅमिन बी असतं. मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने त्यातील पोषक तत्वांची क्षमता वाढते. तसेच, ते पचायला सोपे, पौष्टिक आणि रुचकर असतात.
 
कोशिंबीर


शक्यतो जेवणाबरोबर सॅलड खा. अन्नाचे पूर्ण पचन होण्यासाठी कोशिंबीरीचे सेवन करणे आवश्यक आहे. सॅलडमध्ये काकडी, टोमॅटो, मुळा, गाजर, कोबी, कांदा, बीटरूट इत्यादींचा समावेश करा. त्यामध्ये नैसर्गिकरित्या असलेले मीठ आपल्यासाठी पुरेसे आहे. वर मीठ घालू नका.
 
तृणधान्याचं सेवन करा 


आपल्या आहारात गहू, ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्यांचे सेवन करा. यामुळे बद्धकोष्ठता होणार नाही आणि रोगप्रतिकारक शक्तीही तंदुरुस्त राहील.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : पावसाळ्यात तुम्हीही वारंवार आजारी पडता का? 'हे' 5 खाद्यपदार्थ तुमची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात