Why We Feel Sleepy In Winter: हिवाळ्यात (Winter Season) अनेकांना जास्त वेळ झोप लागते. बऱ्याच लोकांना वेळा थंडीमुळे अंथरुणावरुन उठावसं वाटत नाही. हिवाळ्या सकाळी लवकर उठायला अनेक लोक कंटाळा करतात. हिवाळ्यात जास्त झोप का लागते? असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. जाणून घेऊयात हिवाळ्यात जास्त झोप लागण्याचे कारण...

जर तुम्हाला वाटत असेल की हिवाळ्यात थंडी वाजते म्हणून जास्त झोप येते, तर हे चुकीचं आहे. ऋतूनुसार आपल्या झोपण्याच्या सवयी बदलतात. बदलत्या ऋतूमुळे तापमानातही बदल होतो आणि झोपेचा कालावधीही वाढतो. आपले शरीर नैसर्गिकरित्या मेलाटोनिन तयार करते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेत होणारा बदल मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम करतो.

काय आहे मलाटोनिन? (What Is Melatonin?)मेलाटोनिन (Melatonin) हा शरीरातील एक हार्मोन आहे, जो शरीरातील पाइनल ग्रंथीमधून बाहेर पडतो. या हार्मोनमुळे हिवाळ्यात जास्त झोप येते. पाइनल ग्रंथी मेंदूमध्ये असते. जेव्हा मेलाटोनिन नावाचा हा हार्मोन बाहेर पडतो तेव्हा आपल्याला झोप येऊ लागते. हिवाळ्यात उन्ह कमी असते. त्यामुळे मेलाटोनिनचे सप्रेशन उन्हाळ्यामध्ये जितके होते, तितके होत नाही.

व्यायामाचा अभाव, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली, सूर्यप्रकाशाचा अभाव, कमकुवत प्रतिकारशक्ती आणि सर्दी आणि फ्लूसारखे आजार ही देखील हिवाळ्यात (Winter) जास्त झोप येण्याची काही कारणे आहेत. या सर्व गोष्टींमुळे हिवाळ्यात तुमच्या झोपेवर परिणाम होतो. हिवाळ्यात जास्त वेळ झोपणं टाळायचे असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करु शकता-

या टिप्स करा फॉलो: 

सूर्यप्रकाशात काही वेळ थांबा.15 ते 30 मिनिट रोज व्यायाम करा.दिवसा झोपणे टाळा, रात्री वेळेवर झोपा.रात्री जास्त जेवण करु नका. रात्री जेवणामध्ये हलका आहार घ्या.

जास्त थंडी जाणवतं असेल तर डॉक्टरांना सल्ला घ्याहिवाळ्यात (Winter Season) थंडी वाजणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर तुम्हाला हिवाळ्यात थंडी जाणवत नसेल तर याचा अर्थ शरीरात काही समस्या आहेत. या उलट तुम्हाला जास्त थंडी जाणवत असेल, तर तेही आरोग्यासाठी घातक आहे. जर तुम्हाला सतत थंडी जाणवत असेल तर सावध राहण्याची गरज आहे, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Winter : पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त थंडी वाजते, यामागे आहे 'हे' कारण