Weight loss Tips : निरोगी राहण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करणे गरजेचे आहे. तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या आहारात बीन्सचा समावेश करायला हवा. फळांसोबत भाज्या खाणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. बीन्स वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 


किडनी बीन्स, सोया बीन्स, नेव्ही बीन्स, पिंटू बीन्स असे बीन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. बीन्स वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे दररोज आहारात 
बीन्सचा समावेश करायला हवा. 


पचनासाठी फायदेशीर : अनेक अभ्यासांद्वारे असे आढळून आले आहे की बीन्स चरबी कमी करण्यास मदत करतात. बीन्स खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. त्यामुळे पचनाचा त्रासदेखील होत नाही. 


वजन कमी होण्यास मदत : बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. हे फायबर वजन वाढू देत नाही. 


प्रथिने : प्रथिने रक्तातील साखरेची पातळी वाढू देत नाही. त्यामुळे आरोग्यासाठी बीन्स फायदेशीर आहे. 


कॅलरीज : बीन्समध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यामुळे वजन वाढत नाही. त्यामुळे आहारात बीन्सचा समावेश केलाच पाहिजे.


अ‍ॅनिमियाची समस्या दूर करते : बीन्समुळे अॅनिमियासारखी समस्या दूर होते. तसेच शरीरातील रक्ताचे प्रमाणदेखील वाढते. 


रोगप्रतिकारशक्ती वाढते : बीन्स खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे कोरोनाकाळात बीन्स खाणे गरजेचे आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


काय म्हणता...झोप पूर्ण होत नाही ? मग दुधात 'हा' पदार्थ मिसळा, झोपेची समस्या दूर होईल


थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे माहित आहे का? - वाचा


Weight loss Tips : वजन कमी करण्यासाठी रोज खा पिस्ता, रक्त वाढण्यासही होईल मदत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha