Sleep Paralysis Symptoms: धकाधकीची जीवनशैली (Stressful Lifestyle) आणि चुकीच्या आहार (Wrong Diet) पद्धतीमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यासोबतच दररोजच्या धावपळीमुळे अनेकदा आपल्याला पुरेशी झोपही (Sleeping Disease) मिळत नाही. या झोपेच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवतात. पण सध्या कामाचा ताण (Stress) आणि काही चुकीच्या सवयींमुळे आपली झोपण्याची पद्धतच बदलून गेली आहे. 

त्यामुळे आपण अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यापैकीच एक समस्या ज्याला स्लिपिंग पॅरालिसिस म्हणतात. झोपेत उंचावरून पडणं, खोल पाण्यात बुडणं किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू यांसारख्या भयानक गोष्टी पाहणं कोणालाही भीतीदायक वाटू शकतं. परंतु, काही लोकांसाठी ही समस्या खूप गंभीर स्वरूप घेऊ शकते. अनेकदा झोपेत घाबरल्यासारखं होतं किंवा उंचावरुन पडल्यासारखं होतं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही स्लिप पॅरालिसिसची लक्षणं (Symptoms of Sleep Paralysis) असू शकतात. 

स्लिप पॅरालिसिस म्हणजे काय? (What is Sleep Paralysis?)

स्लिप पॅरालिसिस हा एक स्लिपिंग डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये तुम्ही झोपेत असता पण तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही झोपेतून उठला आहात. पण काहीच काम करणं तुमच्यासाठी अशक्य होतं. अशा परिस्थितीत तुम्ही कितीही प्रयत्न केले तरिदेखील तुम्ही हात-पाय हलवू शकत नाही. जर तुम्हालाही झोपेत असं काही झालं असेल तर यालाच स्लिप पॅरालिसिस म्हणतात. स्पष्ट शब्दांत सांगायचं झालं तर, अशा परिस्थितीत मानवाचा मेंदू झोपेतून जागा होतो, पण त्याचं शरीर मात्र झोपेतंच असतं. ही समस्या गाढ झोपेत जाण्यापूर्वी किंवा गाढ झोपेत असताना तुम्हाला ही लक्षणं जाणवू शकतात. 

स्लिप पॅरालिसिसची कारणं काय? (Causes Of Sleep Paralysis)

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मनते, स्लिप पॅरालिसिस एक मज्जासंस्थेशी संबंधित समस्या आहे. जी झोपेत असताना किंवा झोप लागण्यापूर्वी जाणवते. या समस्येचा प्रभाव अनेकदा पौगंडावस्थेत वाढताना दिसतो. 

स्लिप पॅरालिसिसची लक्षणं काय? 

  • झोप कमी येणं
  • स्लिपिंग पॅटर्नमध्ये बदल 
  • मद्यपदार्थांचं अति सेवन 
  • अधिक ताण-तणाव 
  • पॅनिक डिसऑर्डर 

स्लिप डिसऑर्डरचे उपाय (Prevention tips of Sleep Paralysis)

  • सलग कमीत कमी 7 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक 
  • झोप्यापूर्वी कमीत कमी 2 तास आधी मोबाईल किंवा लॅपटॉप पाहू नये 
  • झोपण्याची आणि उठण्याच्या वेळा ठरवा 
  • कमी प्रकाश आणि शांत वातावरण असणाऱ्या खोलीत झोपा 
  • धुम्रपान, मद्यसेवन किंवा कॅफेन यांसारख्या मादक पदार्थांचं सेवन करण्यापासून बचाव करा 
  • नियमितपणे व्यायाम करा 
  • डोकं शांत ठेवा आणि एकाग्रता वाढवा, त्यासाठी दररोज ध्यानधारणा करू शकता. 

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या बातम्या :

What is Sonomammography : सोनोमॅमोग्राफी म्हणजे काय? का आणि कशासाठी करावी लागते 'ही' चाचणी, फायदे काय?