Senior Citizen Health Tips : आपल्या भारतातील सामान्य लोकसंख्या ही साधारण 2 टक्क्यांनी वाढते. पण, त्याहीपेक्षा ज्येष्ठ तसेच वृद्ध लोकांची संख्या ही 4 टक्क्यांनी वाढतेय. वृद्धांची संख्या वाढण्यामागे खरंतर अनेक कारणं आहेत. यामध्ये विस्तारित आयुर्मान, कौटुंबिक रचना, आरोग्याच्या समस्या इ. यांसारखी अनेक कारणं आहेत. 


जेव्हा वृद्धांच्या काळजीचा विचार केला जातो तेव्हा काळजी देण्याच्या प्रणालीचे अनेक घटक अज्ञात राहतात. काळजीवाहू व्यक्तीला सर्वांगीण मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध योग्य दृष्टिकोनाचा अभाव आहे.


आजच्या काळात 40-60 वयोगटातील काम करणाऱ्या पिढीसाठी कुटुंबातील वृद्ध ज्येष्ठ/पालकांचे आरोग्य सांभाळणे हे खरंतर एक आव्हानच झालं आहे. अशातच आपल्या घरातील वृद्धांची जे खरंतर मानसिक आणि शारिरीक समस्यांनी ग्रस्त आहेत अशा रूग्णांची काळजी कशी घ्यावी हा खरंतर प्रश्नच आहे. 


वृद्धांची काळजी घेणाऱ्यांना भेडसावणाऱ्या काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी हेल्दी रिंक्सचे संस्थापक संचालक श्रीहरी शिधये, अभय लोणकर आणि नजमुद्दीन कुवावाला आहेत. जे या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात. त्यामध्ये त्यांनी सांगितलेले काही मुद्दे प्रामुख्याने येतात. 


• ज्येष्ठांच्या विशिष्ट गरजांची जाणीव नसणे - भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही 
• एकदा निवृत्त झाल्यानंतर मानसिक आणि वर्तणुकीतील वृत्तींमध्ये बदल होणे
• अनपेक्षित गैरवर्तन ओळखणे आणि टाळणे याबद्दल जागरूकता निर्माण करणे 
• असंयम, स्मृतिभ्रंश, हालचाल ही ज्येष्ठांना भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम होतो.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


महत्त्वाच्या इतर बातम्या :


No Smoking Day 2024 :"...तर तो दिवस दूर नसेल, जेव्हा तुम्ही धूम्रपानापासून मुक्त व्हाल" आज धूम्रपान निषेध दिन! 'हे' घरगुती उपाय ट्राय करा