मुंबई : भारतामध्ये सकाळची सुरुवात बहुतेकांच्या हातातल्या चहाच्या कपाशिवाय होतच नाही. चहा पिल्याशिवाय अनेकांना चैनच पडत नाही. काही लोक दिवसाला चार कपांहून अधिक चहा पितात. पण डॉक्टरांच्या मते, फक्त 15 दिवस चहा सोडल्याने शरीरावर अनेक सकारात्मक बदल होतात. चहा सोडणं म्हणजे शरीराचा एक प्रकारचा डिटॉक्स, म्हणजे शुद्धीकरणाचा प्रकार आहे. त्यामुळे काही दिवसांतच तुम्हाला बदल दिसायला लागतात.
चहा सोडल्यावर होणारे प्रमुख फायदे
1. झोपेची गुणवत्ता सुधारते
चहामध्ये असलेलं कॅफिन झोपेचं चक्र बिघडवतं. सतत चहा पिल्याने झोप उशिरा लागते आणि ती गाढ लागत नाही. 15 दिवस चहा बंद केल्यावर शरीरातून कॅफिनचा प्रभाव कमी होतो आणि नैसर्गिक, गाढ झोप मिळू शकते.
2. डिहायड्रेशन कमी होतं
कॅफिन हे डाययूरेटिक आहे, म्हणजे शरीरातील पाणी लवकर बाहेर टाकतं. त्यामुळे थकवा, त्वचा कोरडी होणं यासारख्या समस्या वाढतात. चहा बंद केल्यावर पाण्याचं संतुलन सुधारतं आणि त्वचा तजेलदार दिसते.
3. पचन तंत्र सुधारतं
अति चहा पिण्यामुळे अॅसिडिटी, गॅस, पोट फुगणं यासारख्या समस्या होतात. चहा सोडल्यावर पोटाचा pH संतुलन सुधारतं आणि अन्न सहज पचायला लागतं.
4. नैसर्गिक ऊर्जा वाढते
कॅफिनमुळे मिळणारी ऊर्जा काही तासांपुरतीच असते. नंतर सुस्ती आणि थकवा जाणवतो. चहा सोडल्यानंतर शरीर नैसर्गिकरीत्या ऊर्जा निर्माण करतं, ज्यामुळे आपण दिवसभर ताजेतवानेपणा राहतो.
5. त्वचा आणि केसांमध्ये सुधारणा
चहातील टॅनिन आणि कॅफिन मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स कमी करतात. त्यामुळे त्वचा डल आणि केस कमकुवत होतात. चहा सोडल्यानंतर शरीराला पोषण अधिक मिळतं आणि त्वचा-केस दोन्ही हेल्दी दिसतात.
Tea Side Effects : चहा सोडण्याचे सोपे उपाय
- सकाळच्या चहाऐवजी हर्बल टी, लिंबूपाणी किंवा ग्रीन टी घ्या.
- कॅफिन कमी झाल्याने होणाऱ्या डोकेदुखीसाठी भरपूर पाणी प्या.
- साखर आणि प्रोसेस्ड फूड कमी करा, जेणेकरून शरीर लवकर डिटॉक्स होईल.
तज्ज्ञांच्या मते, जास्त कॅफिनचे सेवन हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता, तणाव आणि हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतं. विशेषतः गर्भवती महिलांनी आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी कॅफिनचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरते. त्यामुळेच अशा लोकांनी चहाचे सेवन जास्तीत जास्त टाळावं असं सांगितलं जातं.
Disclaimer : बातम्यांमध्ये दिलेली काही माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणतीही सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या.