Benefits Of Pomegranate Peel : फळ (Fruits) आणि भाज्यांमध्ये (Vegetables) आपल्या शरीराला आवश्यक असणारी प्रथिने, जीवनसत्व आणि इतर आवश्यक घटक मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का फळांच्या सालीमध्येही (Fruits Peel) अनेक औषधी गुणधर्म असतात. आपल्या शरीरासाठी हे फायदेशीर ठरतात. फळांच्या साली आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो. पण या फळांच्या सालीचेही अनेक फायदे असतात, हे आपल्याला माहित नसतं. जर तुम्हीही डाळिंबाची साल (Pomegranate Peel) कचरा समजून फेकून देत असाल, तर थांबा आणि त्याचे फायदे माहित जाणून घ्या.
डाळिंबाची साल ( Pomegranate Peel Benefits) अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपाय आहे. डाळिंबाची साल सुकवून त्याची पावडर करुन घ्या. डाळिंबाच्या सालीची पावडर घसादुखी, खोकला, पोटाच्या समस्या आणि हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फळांच्या सालींपेक्षा भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात.
डाळिंबाच्या सालीची पावडर कशी बनवायची?
एका भांड्यात डाळिंबाची सालं घ्या. सालीवरील पातळ सफेद भागही घ्या. या साली ओव्हनमध्ये 350 अंशांवर 20 मिनिटे गरम करा. यामुळे साली सुकतील. साली सुकल्यानंतर त्यांची बारीक पावडर बनवून घ्या. डाळिंबाची पावडर तयार आहे.
डाळिंबाच्या सालीचा असा करा वापर
डाळिंबाच्या सालीची चहा बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. डाळिंबाच्या सालीचा चहा बनवण्यासाठी एक रिकामी टि बॅग घ्या. यामध्ये एक चमचा डाळिंबाची पावडर टाका. आता ही टी बॅग एक कप गरम पाण्यामध्ये बुडवा. काही मिनिटं ठेवा. तुमचा डाळिंबाचा चहा तयार आहे.
डाळिंबाची साल आरोग्यासाठी उपयुक्त
अतिसार आणि इतर पचन समस्यांवर देखील डाळिंबाची साल एक उत्तम घरगुती उपाय आहे. डाळिंबाची साल व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. महागड्या व्हिटॅमिन सप्लिमेंट्सऐवजी तुम्ही आहारात याचा वापर करु शकता. डाळिंबाचा चहा बनवून किंवा गरम पाण्यात डाळिंबाची पावडर मिसळून तुम्ही त्याचं सेवन करु शकता.
डाळिंबाच्या सालीची पावडर अत्यंत गुणकारी
- त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असल्याने ते बॅक्टेरिया आणि इतर संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात.
- डाळिंबाच्या सालीमध्ये अनेक गुणधर्म असतात ज्यामुळे हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करतात आणि त्वचेच्या पेशी पुन्हा निर्माण करतात.
- डाळिंबाची साल ही तुमच्या त्वचेच्या सर्व समस्यांवर उपायकारक आहे.
- डाळिंबाची साल त्वचेचा डिटॉक्सिफायर म्हणून काम करून मदत करते, जे विषारी हटवण्यास मदत करते. डाळिंबाच्या सालीचा त्वचेवर वापर केल्यास तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल.
Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.