Mediterranean Diet : गर्भधारणेसाठी (Pregnancy) अनेक महिला (Women) आयव्हीएफ उपचारांची (IVF Treatment) मदत घेतात. आयव्हीएफ (IVF) उपचार (Treatment) अधिक फलदायी ठरण्यासाठी काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. आयव्हीएफ उपचारादरम्यान गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी मेडिटेरेनियन डाएट (Mediterranean Diet) फायदेशीर ठरते. आयव्हीएफ उपचारादरम्यान मेडिटेरेनियन डाएट (Mediterranean Diet) घेतल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते, असा दावा संशोधनाद्वारे करण्यात आला आहे.


 IVF उपचारादरम्यान प्रेग्नंसीची शक्यता वाढवण्यासाठी 'हा' आहार घ्या


आयव्हीएफ उपचारादरम्यान महिलांना मेडिटेरेनियन डाएट (Mediterranean Diet) घेतल्यास प्रेग्नंसीची शक्यता वाढते, असं एका अभ्यासात उघड झालं आहे. मेडिटेरेनियन डाएटमध्ये फळे, भाज्या, शेंगा या पदार्थांचा समावेश असतो. पूवीर्च्या अयशस्वी IVF उपचारांनंतर महिलांसाठी अनेकदा सहायक उपचार लिहून दिले जातात, परंतु हे पूरक नेहमीच काम करत नाहीत. या अभ्यासात नऊ सामान्य पूरक पदार्थांचे परीक्षण केले गेले आणि असे आढळून आले की त्यांचे परिणाम विसंगत आणि कमकुवत होते.


संशोधनात काय समोर आलं?


भूमध्यसागरीय आहार आयव्हीएफसाठी अधिक फायदेशीर असू शकतो, असं संशोधनात आढळून आलं आहे. या आहारामध्ये असलेले फायबर, ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि जीवनसत्त्वे याचा समावेश असतो, यामुळे गर्भाचा विकास आणि गर्भधारणेची शक्यता वाढते, असं संशोधनाच्या अहवालात समोर आलं आहे.


मेडिटेरेनियन डाएट आयव्हीएफसाठी अधिक फायदेशीर 


भूमध्यसागरीय आहार म्हणजेच मेडिटेरेनियन डाएट (Mediterranean Diet) या आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये, ड्रायफ्रुट्स, मासे आणि ऑलिव्ह ऑइल यांचा जास्त वापर केला जातो आणि प्रक्रिया केलेले पदार्थ कमी प्रमाणात घेतले जातात. हा आहार घेतल्यास आयव्हीएफ उपचारादरम्यान प्रेग्नंसीची शक्यता वाढते, असं संशोधनात उघड आलं आहे.


या अभ्यासाचे प्रमुख लेखक प्रोफेसर रॉजर हार्ट यांनी सांगितलं की, जर एखादी महिला आयव्हीएफ करत असेल तर, ती मेडिटेरेनियन डाएट (Mediterranean Diet) घेऊ शकते. ज्या महिलांवरीस पहिले IVF उपचार अयशस्वी झाले असल्यास त्या महिला पुन्हा आयव्हीएफ उपचार घेणं फायदेशीर ठरू शकतात. गर्भधारणेसाठी कोएन्झाइम Q10 आणि DHEA पूरक आहार घेणे देखील फायदेशीर ठरू शकते. ही प्रकरणांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिडचे सेवन गर्भाचा विकास आणि गर्भधारणेची शक्यता देखील वाढवू शकते. या सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने यशस्वी IVF उपचारांची शक्यता वाढवता येते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Fertility : मोठी बातमी! वंध्यत्वावर लवकरच प्रभावी उपचार सापडणार, मेंदूतील एका विशेष पेशीच्या शोधामुळे आशा बळावली