Health Tips In Marathi : सणासुदीच्या काळात वेगवेगळ्या पक्वान्नांचा आस्वाद घेणे ओघाने आलेच, साहजिकच आहारात कॅलरीज, फॅट आणि शर्करा यांचे प्रमाण वाढते, त्याबरोबरीनेच या सर्व पक्वानांमध्ये मीठ (सोडियम) देखील जास्त प्रमाणात असते. सणासुदींकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनामध्ये थोडा बदल करणे आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. खरे पाहता, हीच ती वेळ असते जेव्हा आपण आपल्या आहाराकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे आणि खूप जास्त गोड आणि जंक फूड यामुळे शरीराचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जाणीवपूर्वक नियंत्रण ठेवले पाहिजे. सणासुदीच्या काळात एकामागोमाग एक, भरपूर पदार्थ खाणे जाणीवपूर्वक टाळले पाहिजे, आपल्या आरोग्याचा समतोल ढळू नये यासाठी हे खूप गरजेचे आहे टाटा सॉल्ट सुपरलाईट येथील प्रसिद्ध पोषण सल्लागार कविता देवगण यांनी यासाठी महत्वाच्या टीप्स दिल्या आहेत..
यंदा सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना सात अतिशय सोप्या गोष्टी नक्की ध्यानात ठेवा :
1. सणासुदीचा आनंद घ्यायचा पण आरोग्याला काहीही नुकसान पोहोचू द्यायचे नसेल तर प्रमुख मंत्र आहे संयम. तळलेल्या फरसाणाची बशी तुमच्यासमोर ठेवली जाते तेव्हा ते सगळे फस्त करण्याऐवजी एखादा चमचाभर खा. सध्याच्या काळात आपल्या आजूबाजूला अनेक वेगवेगळे आवडीचे पदार्थ असताना, कोणताही खाद्यपदार्थ आपण किती खातो यावर नियंत्रण ठेवणे ही बाब खूप आवश्यक आहे.
2. दिवसातून किमान एकदा सात्विक जेवण जेवा. त्यामुळे इतर जेवणे आणि अनावश्यक स्नॅक्स यामुळे शरीरात वाढलेल्या कॅलरीजचे संतुलन करता येते. वजन योग्य प्रमाणात राहावे यासाठी हे गरजेचे आहे. सात्विक अन्न म्हणजे फक्त फळे, कोशिंबिरी आणि भाज्या खा.
3. सणासुदीच्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते त्यावर नियमितपणे नियंत्रण ठेवून हायपरटेन्शनची जोखीम जाणीवपूर्वक टाळा. विश्वसनीय ब्रँडचे कमी सोडियम असलेले मीठ वापरू शकता, या मिठामध्ये रिफाईंड आयोडाइज्ड मिठापेक्षा 15% ते 30% कमी सोडियम असतो.
4. सण म्हणजे कार्बोहायड्रेट्स असलेले खाद्यपदार्थ एकामागोमाग एक खाल्ले जाणे. तुमच्या आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांचा जाणीवपूर्वक वापर करा. प्रत्येक आहारामध्ये किंवा स्नॅक्समध्ये प्रथिने व त्यासोबत कॉम्प्लेक् कार्बोहायड्रेट्स असे मिश्रण असलेले पर्याय निवडा.
5. सणासुदीचे जड जेवण आम्लयुक्त असण्याची दाट शक्यता असते, यामुळे आपल्या आतड्यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे आहारामध्ये अल्कलाईन खाद्यपदार्थांचा जाणीवपूर्वक समावेश करून पोटाचा पीएच योग्य राखा. यामध्ये लिंबू खूप उपयुक्त ठरू शकतात. आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा, त्यामुळे देखील पोट अल्कलाईन होते.
6. आहारामध्ये साखरेचा अति वापर हा नेहमीच घातक असतो. त्यावर मात करण्यासाठी दररोज थोडी दालचिनी खा. या मसाल्यामध्ये हायड्रोक्सिचालकोन असते जे फास्टिंग ग्लुकोज नियंत्रणात राखण्यास मदत करते.
7. नियमितपणे, भरपूर पाणी प्या. दररोज कमीत कमी सात ते दहा ग्लास भरून पाणी प्यायले गेले पाहिजे. यामुळे शरीरातील विषद्रव्ये सौम्य होतात आणि (जंक फूड खाता त्यामधून शरीरात शिरलेला) तुमच्या शरीरातून सहजपणे बाहेर निघून जातात.