Heart Blockage: आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण यासारख्या अनेक गोष्टींमुळे मोठ्यातले मोठे आजार अनेकांना होताएत. आजकाल ह्रदयाचे आजार सामान्य झाले आहेत. यामध्ये हृदयाचे ठोके वरपासून खालपर्यंत जातात. ही समस्या गंभीर झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. आजकाल ह्रदयविकाराचा धोका देखील लक्षणीय वाढला आहे. हार्ट ब्लॉकेज स्थिती देखील त्यापैकी एक आहे. कोणत्या वयोगटातील लोकांना याचा सर्वाधिक धोका आहे? जाणून घेऊया..


हृदयाच्या समस्यांसाठी जबाबदार कोणत्या गोष्टी?


हार्ट ब्लॉकेजबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वेळा, यामुळे एखाद्या व्यक्तीचे हृदय धडधडण्यची गती मंद होते आणि नंतर अचानक थांबते. हार्ट ब्लॉकेजमध्ये हृदयाला रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नाही. रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा झाल्यामुळे हे घडते, हा प्लेक म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल आहे. म्हणजेच कोलेस्टेरॉल देखील हृदयाच्या समस्यांसाठी जबाबदार असू शकते. खराब कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयाला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. यामध्ये तुमच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, हकीम सुलेमान यांचे म्हणणे आहे की पोटॅशियम वाढल्याने हृदयात अडथळा निर्माण होतो. कोणाला जास्त धोका आहे ते जाणून घ्या.


'या' वयोगटातील लोकांना जास्त धोका?


हकीम सुलेमान यांच्या म्हणण्यानुसार, वाढत्या वयाबरोबर हृदय आणि रक्तवाहिन्या कमकुवत होतात, ज्यामुळे हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढू शकतो. या वयोगटातील बहुतेक लोक 40 ते 50 वयोगटातील आहेत, ज्यांना हार्ट ब्लॉकेज असू शकते. ज्या लोकांचे रक्त जाड असते त्यांनाही हार्ट ब्लॉकेजची समस्या असते. ते म्हणतात की अशा परिस्थितीत लोकांनी रात्री सर्वात जास्त त्रास होते, त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढते.


हार्ट ब्लॉकेजची लक्षणं



  • छातीत वेदना जाणवणे.

  • खूप थकवा येणे.

  • श्वास घेण्यात अडचण.

  • हृदयाचे ठोके अचानक वाढणे.

  • वेगाने श्वास घेणे.

  • मळमळ किंवा चिंता.

  • चक्कर येणे आणि भोवळ येणे.


'हा' रस प्यायल्याने समस्या दूर होईल


सुलेमान यांनी 40 वर्षांवरील सर्व लोकांना एक ज्यूस पिण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून तुम्ही ब्लॉकेजच्या समस्येपासून दूर राहाल. हे करण्यासाठी, तुम्हाला प्रथम आल्याचा रस, लिंबाचा रस, लसूण रस आणि ऑलिव्ह व्हिनेगर घ्यावा लागेल. तुम्हाला हा रस 1 लिटरच्या प्रमाणात काढावा लागेल आणि त्यात 1 लिटर व्हिनेगर देखील घालावे लागेल. यानंतर, 4 लिटर पर्यंत रस तयार होईल. तुम्हाला ते रोज प्यावे लागेल. सकाळी प्यायल्याने जास्त फायदा होईल.


अजून काय कराल?


निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा.
धुम्रपान टाळा.
शारीरिक क्रिया करत राहा.
पुरेशी झोप घ्या.
तणाव घेणे टाळा.


हेही वाचा>>>


Health: मोठ्यातले मोठे आजार राहतील दूर! स्वामी रामदेवांचा 'सीक्रेट डाएट प्लॅन! अनेकांना माहीत नाही, जीवनात घडवून आणतील मोठे बदल


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )