Depression Effects On Health : आजकाल अनेक लोक नैराश्यातून जात आहेत. भारतात दर वीस लोकांपैकी एक व्यक्ती नैराश्यातून जात आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्याची चांगली काळजी घेऊन नैराश्याला दूर ठेवता येते. भारतातील बहुतेक लोक नैराश्याच्या आजाराला आजार मानत नाहीत. तर कधीकधी लोक नैराश्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतात नैराश्यग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे हा रोगापासून बचाव करणे गरजेचे आहे. 


नैराश्याची लक्षणे
- कोणत्याही कामात मन न लागणे.
- सतत उदास राहणे.
- छोट्या-छोट्या कामात थकवा जाणवणे.
- झोप न लागणे.
- भूक न लागणे.
- सतत नकारात्मक विचार करणे.


जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे सलग दोन आठवडे जाणवत असतील तर तुम्ही नैराश्याने ग्रस्त आहात. अनेक वेळा नैराश्याने ग्रासलेल्या लोकांना असे वाटते की, त्यांना कोणीही मदत करू शकत नाही. अशावेळी त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 


नैराश्यात काळजी कशी घ्यावी?
-  नैराश्याने ग्रासलेल्या लोकांशी बोलत राहणे आणि त्यांची मनस्थिती समजून घेणे खूप महत्वाचे आहे.
- नैराश्यात नकारात्मक विचार खूप येतात, ते टाळा. सकारात्मक गोष्टींचा विचार करा आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.
- तुमची खाण्याची आणि झोपण्याची वेळ निश्चित करा. दिवसभरात थोडं थोडं खात राहावे. 
- सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. - रोज थोडा वेळ योगा आणि व्यायाम करा.
- आवडते संगीत ऐकणे
- आवडत्या ठिकाणी भेट देणं. पर्यटनस्थळी भेट द्या. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या


Cabbage Benefits : कोबीमध्ये असते दूधाइतके कॅल्शियम, जाणून घ्या याचे फायदे..


Covid-19 : Omicron variant दरम्यान, लवंग, मेथी आणि तुळस 'या' प्रकारे करा सेवन, घसादुखीही होईल दूर


Omicron Variant: नखांचा रंग बदलणे असू शकते ओमायक्रॉनचे लक्षण, चुकूनही करू नका दुर्लक्ष!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha