Pain Killers : डोकेदुखी, कंबरदुखी झाल्यास सर्वात आधी पेनकिलरची (Pain Killer) गोळी घेणं हा आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या आता सवयीचा भाग झाला आहे. बहुतेक लोक डोकेदुखी झाल्यानंतर डिस्प्रिन आणि कंबरदुखी झाल्यानंतर कॉम्बिफ्लाम सारखी पेनकिलरची औषधं घेतात. या औषधांचा परिणाम देखील लवकर दिसून येतो. या औषधांमुळे दुखण्यावर काही मिनिटांतच आराम देखील मिळतो. काही लोक असेही असतात जे डॉक्टरांचा सल्ला न घेता पेनकिलरच्या गोळ्या जोपर्यंत आराम मिळत नाही तोपर्यंत त्यांचं सेवन करतात. पण, पेनकिलरच्या गोळ्या सतत खाल्ल्याने दुखण्यावर लगेच आराम मिळेल असा जर तुमचा समज असेल तर वेळीच थांबा. कारण याचे अनेकदा साईड इफेक्ट्सदेखील होऊ शकतात.


डॉक्टरांचं म्हणणं काय?


पेनकिलर्सच्या गोळ्या घेण्याबाबत डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, पेनकिलरच्या गोळ्या डॉक्टरांचा सल्ला न घेता दिवसातून बऱ्याचदा घेणं हे धोकादायक ठरू शकते. पेनकिलरची औषधं घेणं आपल्या आरोग्यासाठी सुरक्षित नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. प्रत्येक पेनकिलर औषधांचे दुष्परिणाम होतात. अशा वेळी कोणत्याही सल्ल्याशिवाय औषधं घेतल्यास गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. 


दिवसातून किती वेळा वेदनाशामक औषधं घ्यावीत?


तज्ज्ञांच्या मते, पॅरासिटामॉल हे दुखापत, वेदना झाल्यानंतर सर्वात जास्त प्रमाणात खाल्ली जणारी गोळी आहे. आता तर लहान मुलांनाही वेदना झाल्यास, किंव बरं वाटत नसल्यास पॅरासिटामॉल घ्यावे हे माहीत आहे. यामध्ये 500 मिलीग्रामच्या गोळ्या 8 तासांच्या अंतराने दिवसातून 3-4 वेळा जर तुम्ही घेतल्या तर त्याचा शरीरावर फारसा परिणम होत नाही. पण, या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. हे औषध 3-4 दिवसांपेक्षा जास्त काळ घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या औषधांचे सेवन करावे.


आजाराचं निदान झाल्याशिवाय पेनकिलरची औषधं खाऊ नका


जोपर्यंत एखाद्या आजाराचे निदान होत नाही, त्याचे मूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत सतत वेदनाऔषधे घेणे हानिकारक ठरू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कारण प्रत्येक वेदनेच्या औषधाचे गंभीर दुष्परिणाम असतात, जे लगेच दिसत नाहीत पण ते पुन्हा पुन्हा घेतल्याने शरीरावर धोकादायक पद्धतीने परिणाम होऊ शकतो.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Winter Health Tips : हिवाळ्यात आजारांपासूनही दूर राहाल आणि रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल; फक्त 'या' भाज्यांचा आहारात समावेश करा