Health Tips : गेल्या काही दिवसांपासून देशभरात आजार आणि संसर्गाची लाट पसरत चालली आहे. एकीकडे कोरोनानंतर (Covid19) निपाह व्हायरसने (Nipah Virus) लोकांची चिंता वाढवली आहे, तर दुसरीकडे डेंग्यूच्या (Dengue) रोगाचं वाढतं प्रमाण लोकांची चिंता वाढवत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे.
डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा एक गंभीर रोग आहे. जो सहसा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये याचा प्रादुर्भाव होतो. लहान मुले आणि वृद्धांना याचा अधिक धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत, या गंभीर आजारापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. तुम्हालाही तुमच्या मुलाला सुरक्षित ठेवायचे असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
योग्य कपडे निवडणे
डेंग्यूपासून बचाव करण्याचा सोपा मार्ग म्हणजे डासांपासून स्वतःचे संरक्षण करणे. आपल्या मुलांना डासांपासून दूर ठेवण्यासाठी हलके, सैल-फिटिंग आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. असे केल्याने त्यांचे डासांपासून संरक्षण होईल. तसेच, त्यांना संध्याकाळी किंवा रात्री घराबाहेर पडू देऊ नका.
घराभोवती पाणी साचू देऊ नका
डेंग्यू टाळण्यासाठी तुम्ही तुमचे घर आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या घराजवळ कुठेही पाणी साचू देऊ नका. कारण अशा पाण्यात डासांची उत्पत्ती सहज होते. तसेच, संध्याकाळी घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद करा, जेणेकरून डास घरात प्रवेश करू शकणार नाहीत.
स्वच्छतेची काळजी घ्या
डेंग्यू हा एडिस प्रजातीच्या डासाच्या चाव्याव्दारे डेंग्यू नावाच्या विषाणूमुळे पसरतो. कोणत्याही प्रकारचे जंतू इत्यादी टाळण्यासाठी आपल्या मुलांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. यासाठी मुलांना जेवण्यापूर्वी, शाळेतून परतल्यानंतर आणि दूषित वस्तूंना स्पर्श केल्यानंतर हात धुण्याची सवय लावा.
मुलांना पौष्टिक आहार द्या
डेंग्यू सामान्यतः कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये लगेच प्रवेश करतो. अशा वेळी, आपल्या मुलांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी, त्यांना जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या सर्व आवश्यक पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार द्या. यासाठी तुम्ही संत्री, किवी, लिंबू, स्ट्रॉबेरी, कोबी, फ्लॉवर आणि टोमॅटो या व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा आहारात समावेश करू शकता, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होईल.
मच्छरदाणी किंवा मॉस्किटो रिपेलेंट क्रीम
प्रामुख्याने डासांमुळे पसरणारा हा आजार टाळण्याचा उत्तम उपाय म्हणजे डासांना स्वतःपासून दूर ठेवणे. अशा परिस्थितीत, तुमच्या मुलांना डासांपासून वाचवण्यासाठी तुम्ही मच्छरदाणी किंवा कोणतीही मॉस्किटो रिपेलेंट क्रीम वापरू शकता.
घराची स्वच्छता ठेवा
कोणत्याही आजारापासून दूर राहण्यासाठी आवश्यक स्वच्छतेची काळजी घेणे आवश्यक आहे. निरोगी वातावरण तयार करण्यासाठी, चादर, ब्लँकेट आणि इतर घरगुती वस्तू नियमितपणे धुवा, बदला आणि स्वच्छ करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :