Immunity Boosting Tips: शरीर निरोगी ठेवण्यासाठी, योग्य प्रतिकारशक्ती असणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या कोरोना संसर्गकाळात तर रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे खूप महत्वाचे झाले आहे. अशा परिस्थितीत, आपल्यापैकी बरेचजण प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेक पद्धती देखील अवलंबतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचे सेवन करतात, जे तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. पण, आता तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही, कारण इथं आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपायांचा अवलंब करून तुमची प्रतिकारशक्ती कशी मजबूत करायची ते सांगणार आहोत. आपण आपली प्रतिकारशक्ती कशी मजबूत करू शकतो जाणून घ्या.



चांगली झोप प्रतिकार शक्ती मजबूत करते
तुम्हाला माहित आहे का की चांगल्या पोषणाबरोबरच चांगली झोप ही रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी खूप महत्वाची आहे. यासाठी तुम्ही रात्री 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक आहे. झोपताना खोलीत अंधार ठेवा. महत्वाचं म्हणजे झोपण्यासाठी आणि सकाळी उठण्यासाठी समान वेळ ठेवा.


कमी ताण घ्या
तुम्हाला माहित आहे का की ताण घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे रोग तुमच्या शरीराला घेरू शकतात. कॉर्टिकोस्टिरॉईड्स स्ट्रेस हार्मोनमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते, म्हणून स्वतःला तणावापासून दूर ठेवा किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरुन टेंशन घेणे थांबवा.


नियमित व्यायाम करा
हे सर्वांना माहित आहे की व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. यासाठी दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. व्यायामामुळे तुमचे शरीर निरोगी राहते आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते. यासोबतच शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती देखील मिळते. एवढेच नाही तर जर तुम्ही रोज व्यायाम केलात तर तुम्हाला सर्दी-खोकला कमी होते.


योग्य आहार


रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी योग्य आहार घेणेही फार महत्वाचे आहे. यासाठी हिरव्या पालेभाज्या, फळे, दूध, मासांहार योग्य प्रमाणात घेणे आवश्यक आहे. चुकीचा आहार देखील तुमची प्रतिकारशक्ती कमी करू शकतो.