पुणे: राज्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) मुळे (जीबीएस) एकाचा सोलापुरात तर आणखी एकाचा संशयित रुग्णाचा पिंपरीमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर पुणे शहरातील एकूण रुग्णांची संख्या 111 वर पोहोचली आहे. पुण्यासह राज्यातील चार जिल्ह्यात जीबीएसचे रूग्ण आढळले आहेत. नागपूर, सोलापूर, कोल्हापूर याठिकाणी रूग्ण आढळून आले आहेत. या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काल (सोमवारी, ता, 27) सात जणांच्या तज्ज्ञांचे पथक राज्यात तैनात केले आहे. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहेत. दरम्यान दूषित पाण्यामुळेच जीबीएस पसरतो हे समोर आलं आहे. अशातच पुण्यात विहिरीतील दूषित पाण्यामुळेच जीबीएस पसरत असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे.
विहिरीतील दूषित पाण्यामुळेच जीबीएस आरोग्यमंत्री
पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमची (Guillain Barre Syndrome) रुग्णसंख्या वाढली असून आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे नांदेड परिसरात पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या परिसरातील आहेत. या विहिरीतील दूषित पाण्यामुळेच हे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काल (सोमवारी, ता, 27) दिली आहे. नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहे. राज्यातील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याची गरज आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाकडून नियमावली तयार केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
‘बाधित जिल्ह्यांतील भागांत सर्वेक्षण’
जीबीएस आजारावती प्रतिबंध घालण्यासाठी राज्यस्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथकाने बाधित भागाला तातडीने भेट देऊन बाधित जिल्ह्यातील भागांत सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. रुग्णांचे शौच आणि रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. त्यातील काही नमुन्यांमध्ये नोरो व्हायरस, कॅम्फेलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग असल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे बाधित जिल्ह्यातील पाण्याचे नमुने रासायनिक व जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. जीबीएस रुग्ण आढळून आल्यास त्वरित शासकीय आरोग्य यंत्रणा यांना कळवण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांनाही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान गुलेन बॅरी सिंड्रोम(Guillain Barre Syndrome)चा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये जास्त आढळून येत आहे. 0 ते 19 वयोगटातील एकूण 19 रुग्ण आहेत. तर 20 ते 29 वयोगटातील 20 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहर व परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोम(Guillain Barre Syndrome)चा या आजाराचे एकूण 111 रुग्ण आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे रुग्ण हे वाढत असल्याच पाहायला मिळत आहे. दिनानाथ रुग्णालय :- 26ससून रुग्णालय :- 21काशीबाई नवले रुग्णालय :- 9सह्याद्री डेक्कन :- 7पूना हॉस्पिटल :-5भारती विद्यापीठ :- 4वायसीएम :- 4पल्स हॉस्पिटल :- 3साईनाथ हॉस्पिटल :- 3डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जिल्हा रुग्णालय :-2ग्लोबल हॉस्पिटल :- 2श्रेयानस हॉस्पिटल :- 2पुण्यातील विविध भागातील इतर 13 रुग्णालयात प्रत्येकी एक रुग्णउपचार घेत आहे.
वयोगट
0 ते 09 :- 19 रुग्ण10 ते 19 :- 15 रुग्ण20 ते 29 :- 20 रुग्ण30 ते 39 :- 13 रुग्ण40 ते 49 :- 12 रुग्ण50 ते 59 :- 13 रुग्ण60 ते 69 :- 08 रुग्ण70 वर्षांवरील :- 1 रुग्ण
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसारपोटदुखीतापमळमळ किंवा उलट्या